ETV Bharat / city

Sheena Bora Murder Case : इंद्राणी मुखर्जीने आज सीबीआय कोर्टात नोंदवली हजेरी - इंद्राणी मुखर्जी ताज्या बातम्या

मागील आठवड्यात जामिनावर सुटलेले मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी ( Indrani Mukherjee ) आज न्यायालयात येऊन हजेरी नोंदवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना काही अटी व शर्ती च्या आधारावर जामीन देण्यात आला होता. त्याचा अनुषंगाने आज इंद्राणी मुखर्जी सीबीआय कोर्टात हजर नोंदवण्यात करिता आल्या होत्या.

Sheena Bora Murder Case
Sheena Bora Murder Case
author img

By

Published : May 27, 2022, 9:02 PM IST

मुंबई - मुंबई शहरातील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मुख्य साक्षीदार शीना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात आज साक्ष देण्याकरिता येणार होता. मात्र, आज संबंधित कोर्टात न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे आज राहुल मुखर्जीची साक्ष नोंदवण्यात आली नाही. मागील आठवड्यात जामिनावर सुटलेले मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी ( Indrani Mukherjee )आज न्यायालयात येऊन हजेरी नोंदवली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना काही अटी व शर्ती च्या आधारावर जामीन देण्यात आला होता. त्याचा अनुषंगाने आज इंद्राणी मुखर्जी सीबीआय कोर्टात हजर नोंदवण्यात करिता आल्या होत्या. आता या प्रकरणात पुढील सोनवणे 9 जून रोजी होणार आहे. त्यावेळी इंद्राणी मुखर्जी समोर मुख्य साक्षीदार असलेले राहुल मुखर्जी जबाब नोंदवणार आहे. मागील आठवड्यात राहुल मुखर्जी साक्ष नोंदणी याकरिता येणार होता. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्याने साक्ष देण्याकरीता न्यायालयात येऊ शकत नाही, अशी माहिती राहुल मुखर्जी यांच्या वकिलाने न्यायालयासमोर दिल्यानंतर आता या प्रकरणात साक्षी देण्याकरिता 27 मे रोजी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, आज कोर्ट सुट्टीवर असल्याने साक्ष नोंदवता आली नाही.

पत्रात आणखी काय लिहिलंय? - सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले. जिने तिला सांगितलं की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्याला, अशी मागणी इंद्राणीनं केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद होती.

फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो? - एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असंही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं होतं.

काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

हेही वाचा - 'त्या' वक्तव्याचा खुलासा करा, महिला आयोगाचे चंद्रकांत पाटलांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.