मुंबई - हिंद महासागरात सक्रिय असलेल्या चीनला टक्कर देतानाच शेजारील पाकिस्तानचीही चिंता वाढवणारी ‘स्कॉर्पिन‘ श्रेणीतील तिसरी पाणबुडी आयएनएस ‘करंज’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्यामुळे भारतीय समुद्री सीमा अधिक बळकट झाली आहे.
नौदलाचे सामर्थ्य वाढले -
करंज पाणबुडीमुळे नौदलाचे सामर्थ्य वाढले असून भारतातील पाणबुडींची संख्या एकूण १८ झाली आहे. यात १६ पाणबुड्या डिझेल व इलेक्ट्रिक इंजिनच्या असून दोन पाणबुड्या न्यूक्लिअर इंजिनवर चालणाऱ्या आहेत. करंज पाणबुडी मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा - 'खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची संधी देतंय का?'
ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था -
अत्याधुनिक तंत्रज्ञान, शत्रूंना अचूक हेरून त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी कमी आवाजामुळे शत्रूंच्या नजरेपासून दूर राहू शकते. १८ टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदिंनी सज्ज अशी करंज पाणबुडी
६७.५ मीटर लांब, तर १२.३ मीटर इतकी उंचीची आहे. पाणबुडीचे वजन १ हजार ५६५ टन इतके आहे. या पाणबुडीमध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.
हे ही वाचा - युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर