ETV Bharat / city

Indian Youth Congress : युवक काँग्रेस अडकली घराणेशाहीच्या विळख्यात! - युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाल राऊत

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची वर्णी लागली आहे. भारतीय युवक काँग्रेस तरुणांच्या हाती असली पाहिजे, त्यासाठी मोठ्या नेत्यांच्या मुलांना संधी मिळण्याऐवजी धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. या निवडीमुळे पुन्हा घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित होत आहे.

युवक काँग्रेसच्या झेंड्याचे संग्रहित छायाचित्र

author img

By

Published : Mar 18, 2022, 8:03 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील प्रदेश युवक काँग्रेस घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर पडताना दिसत नाही. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची वर्णी लागली आहे. भारतीय युवक काँग्रेस तरुणांच्या हाती असली पाहिजे, त्यासाठी मोठ्या नेत्यांच्या मुलांना संधी मिळण्याऐवजी धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र राहुल गांधी यांच्या या प्रयत्नांना महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. महाराष्ट्रातील युवक काँग्रेस ही बड्या नेत्यांच्या छत्र छायेतून बाहेर पडत नाही. बड्या नेत्यांच्या मुलांना राजकारणात संधी देणारे व्यासपीठ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

बड्या नेत्यांचा वारसा चालू

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर मावळते अध्यक्ष सत्यजित तांबे होते. सत्यजित तांबे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तर डॉक्टर सुधीर तांबे यांचे सुपुत्र आहेत. तांबे यांच्या आधी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा विश्वजीत कदम यांनी सांभाळली आहे. विश्वजीत कदम हे शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत कदम यांच्या पूर्वी राजीव सातव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती राजू सातव हे माजी मंत्री रजनी सातव यांचे सुपुत्र होते.

कुणाल राऊत यांच्या पारड्यात सर्वाधिक मते

कुणाल राऊत यांनी निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ५ लाख ४८ हजार २६७ मते मिळवली आहेत. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसचे वरिष्ठ नेते बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील यांना मिळाली आहेत.

मुंबई काँग्रेसमध्येही घराणेशाही

मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा घराणेशाही चालत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार जीशान सिद्दिकी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आधी मतदान आणि त्यानंतर दिल्लीमध्ये मुलाखत घेण्यात आली होती. मुंबई युवक काँग्रेसचे नेते सूरज सिंह ठाकुर यांची दावेदारी नाकारीत जीशान सिद्दिकी यांना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तर ठाकूर यांना कार्याध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले. निवडणुकीतही पहिल्या क्रमांकावर झिशान सिद्दिकी दुसऱ्या क्रमांकावर सुरज सिंग ठाकूर आणि तिसर्‍या क्रमांकावर वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांचे जावई सैफ खान होते. यामुळे काँग्रेस घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर पडताना दिसत नसल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Holi Palanquin Meet Celebration Ratnagiri : रत्नागिरीच्या ग्रामदैवतांचा डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.