मुंबई : मुंबई पोलीस दलातील (women police of Mumbai Police Force) महिला पोलीस अंमलदार प्रियंका नौकुडकर यांनी जर्मनीतील मॅरेथॉन स्पर्धेत भारताचा तिरंगा (Indian tricolor hoisted in Germany) फडकवला. त्यामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. या स्पर्धेत जगभरातून पन्नास हजार हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातल्या पोलिसांपैकी प्रियंका या एकमेव सहभागी झाल्या असून त्यांनी मेडल पटकावले आहे. यानिमित्ताने ई टीव्ही भारतने प्रियांका नौकुडकर (Female Police Officer Priyanka Naukudkar) यांच्याशी साधलेला संवाद.Navratri 2022
अनेक पदाच्या मानकरी प्रियंका : जर्मनी येथे बीएमडब्ल्यू मॅरेथॉन स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वरळी एल तीन येथे कर्तव्यावर असणाऱ्या प्रियंका नौकुडकर या सहभागी झाल्या होत्या. प्रियांका यांनी 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन ३ तास ३६ मिनिटांमध्ये पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करून मुंबई पोलीस दलाचे नाव सातासमुद्रापार झळकवले. प्रियंका यांनी आजवर ५० हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून 50 गोल्ड मेडल, ब्रॉंज व अन्य पदके पटकावले आहेत. तसेच पोलीस दलातर्फे होणाऱ्या नॅशनल गेम मध्येही उत्तमरित्या नेतृत्व प्रियांका यांनी केलेले आहे.
स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद : प्रियंका यांनी सांगितले की, त्याचे शालेय शिक्षण कोल्हापूरमधील गडहिंग्लज जिल्ह्यातील भूळवाडीतील नौकुडकर हायस्कुलमध्ये झाले. त्यांनतर महाविद्यालयीन शिक्षण शिवराज कॉलेजमध्ये पूर्ण केले. आईबाबा शेतकरी असून मला पोलीस बनायचे होते. त्यानंतर मी १०-१२ वर्षांपूर्वी मुंबईत आले. पोलीस दलात भरती झाले. लग्नापूर्वी मी नायगाव येथे राहत होते. माझं लग्न गौरव लोखंडे यांच्याशी झालं, त्यानंतर मी वरळी पोलीस कॅम्प येथे राहू लागली. माझे पती आणि दीर शरद हे देखील पोलीस दलात कार्यरत असून उत्तम स्वीमर आहेत. माझे सासरे देखील पोलीस अधिकारी होते असून, त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. मी वयाच्या १९ व्या वर्षी पोलीस दलात सामील झाले. मला धावण्याची आवड होती. मी राज्य आणि राष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉनमध्ये सामील होत असे. त्यातून माझं आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये निवड झाली. मी जर्मनीत दहा दिवस राहिले होते. माझ्या वरिष्ठ पोलीस सहकार्यांनी मला सराव करण्यासाठी खूप वेळ देत सहकार्य केले. तसेच जर्मनीला जाण्यास प्रोत्साहन मिळाले. माझं आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सामील होण्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झाल्याने मला खूप आनंद वाटत आहे, असे प्रियांका यांनी सांगितले.Navratri 2022