ETV Bharat / city

Coronavirus Cases in India Today : कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासात 16, 464 रुग्ण - आरोग्य विभाग

Coronavirus Cases in India Today : मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली ( Mumbai corona update ) होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. मुंबईत सध्या १७८ बेडवर रुग्ण असल्याची माहिती ( Maharashtra corona update ) पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Coronavirus Cases in India Today
Coronavirus Cases in India Today
author img

By

Published : Aug 1, 2022, 10:52 AM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसामध्ये वाढत असलेला कोरोनाचा आलेख किंचित घटत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. काल दिवसभरात देशात 16 हजार 464 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या ३०० च्या वर, २ मृत्यूची नोंद - मुंबईत गेल्या २४ तासात १३ हजार ४३३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३२२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज २ मृत्यूंची नोंद झाली (2 deaths reported) आहे. २३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २४ हजार ८१३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार २६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ९०१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३०४९ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२३ टक्के आहे.

रुग्णसंख्या स्थिर -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७, १९ जुलैला २८४, २० जुलैला २९०, २१ जुलैला २७३, २२ जुलैला २९९, २३ जुलैला २६६, २४ जुलैला २३८, २५ जुलैला १७६, २६ जुलैला २६३, २९ जुलैला २९०, ३० जुलै २८६ रुग्णांची नोंद झाली आहे.

११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना आज सकाळी साडेअकरा वाजता पीएमएलए न्यायालयात करण्यात येणार हजर

हेही वाचा - Case Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.