ETV Bharat / city

Coronavirus New Cases : चिंता वाढली! कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, नव्या रुग्णांची संख्या 17 हजारांहून अधिक - Corona infection

Coronavirus New Cases : मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला. देशात 17 हजार 135 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय रुग्ण आहेत.

Coronavirus New Cases
Coronavirus New Cases
author img

By

Published : Aug 3, 2022, 11:25 AM IST

मुंबई - देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. गेल्या सलग चार दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचे वबघ्याला मिळाले होते. परंतु, गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.

  • COVID19 | India records 17,135 new cases in the last 24 hours; Active cases at 1,37,057

    — ANI (@ANI) August 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या ३०० च्या वर, शून्य मृत्यूची नोंद - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या खाली रुग्णसंख्या नोंद होत होती. काल त्यात आणखी घट होऊन १६४ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन ३२९ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरानंतर काल शून्य मृत्यूची नोंद झाली, आज दुसऱ्या दिवशीही शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २०७ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

३२९ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात ५ हजार ७८५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३२९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. २६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २५ हजार ३०६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार ७०० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ९५५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३००३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२३ टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात 1886 रुग्णांची नोंद - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1886 कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मंगळवारी दिवसभरात एकूण 2106 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे फक्त मुंबई जिल्ह्यामधील आहे. राज्यामध्ये मंगळवारी ५ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,89,478 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के इतकं झालं आहे.

हेही वाचा - उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुखासह सहा जणांना अटक, न्यायालयात करण्यात येणार हजर

हेही वाचा - Neelam Gorhe on uday samant attack : खोटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करू नका - नीलम गोऱ्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.