मुंबई- देशात सोमवारच्या आकडेवारीप्रमाणे कोरोनाचे २४ तासांत १२,७८१ कोरोना रुग्ण ( India corona update ) आहेत. तर ८,५३७ कोरोना रुग्ण हे बरे झाले आहेत. १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे ७६,७०० रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिचा ४.३२ ( India Coronavirus tracker ) टक्के आहे.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Corona Mumbai ) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज ( रविवारी ) सलग पाचव्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २०८७ रुग्णांची नोंद ( 2087 Corona patients ) झाली असून १ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६५२ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ९१ रुग्ण ऑक्सिजनवर, १३१ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ही आहे कारणे - पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणत नागरिक हे बाधित होत होते. नागरिकांच्या मनात भीती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पाहिलं लसीकरण डोस घेण्यात आल. त्यानंतर ही काही नागरिकांकडून तसेच शासनाच्या आवहानानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक पुढे आले. पण त्याच वेळी तिसरी लाट ओसरली आणि निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे ज्या प्रमाणात दुसऱ्या डोससाठी आणि बूस्टर डोससाठी नागरिक पुढे यायला पाहिजे होत, तेवढ्या प्रमाणत नागरिक पुढे आलेले नाही. तसेच जी काळजी पूर्वी नागरिकांकडून घेतली जात होती. तशी काळजीदेखील नागरिकांकडून घेतली जात नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे डॉ.उदय भुजबळ यांनी दिली आहे.
जवळजवळ 99 टक्क्याहून अधिक रुग्ण हे असिमटेमिक - सध्या जे नवीन व्हेरीयंटचे नवीन रुग्ण सापडत आहे. त्या रुग्णांना एक ते दोन दिवस ताप येणे, अंग दुखी, सर्दी, खोकला, अशी लक्षणे दिसून येत आहे. तर यात विशेष म्हणजे कोणीही जास्त प्रमाणत सिरयस झालेलं नाही. कोणालाही ऑक्सिजनची गरज लागणे, व्हेंटिलेटरची गरज लागणे अशी परिस्थीती निर्माण झालेली नाही. जवळजवळ 99 टक्के हून अधिक रुग्ण हे असिमटेमिक आहे. आणि ते रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहे. परंतु यात ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे.ज्यांना आजार जास्त आहे.अश्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितले.
असे रुग्ण देखील होत आहे बाधित - जे रुग्ण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत देखील पॉझिटिव्ह आले आहेत असे रुग्ण देखील या नवीन व्हेरीयंट मध्ये बाधित होत आहे.पण त्यांच्यातील जो आजार आहे तो अत्यंत माईल्ड स्वरूपाचा आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा-Corona Update India : देशात २४ तासांत १२,८९९ रुग्ण, रुग्णसंख्येत किचिंत घट
हेही वाचा-Response to municipal schools : मनपाच्या इंग्रजी शाळांना प्रतिसाद, दोनशे जागांसाठी सहाशे अर्ज