ETV Bharat / city

India Covid 19 Cases : देशात गेल्या 24 तासात 18,257 नवीन कोरोना रुग्ण आढळले, 42 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 10, 2022, 10:20 AM IST

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार दिल्लीत 648 नवीन कोविड ( Covid ) -19 प्रकरणे आणि 5 संबंधित मृत्यूची नोंद झाली. सकारात्मकता दर 4.22 टक्के आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत ( Mumbai ) 761 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबई - भारतामध्ये 18,257 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, जे काल नोंदवलेल्या 16,103 संसर्ग आणि 24 मृत्यूंपेक्षा किंचित जास्त आहेत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार. सक्रिय प्रकरणे आता 1,28,690 आहेत आणि आजपर्यंत देशभरात 5,25,223 मृत्यूची नोंद झाली आहे. तब्बल 4,28,79,477 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

५.२५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ०९३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५३० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ५.२५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ९७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १७ हजार ८९७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९३ हजार ८६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ४२७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०९८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६१ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्या स्थिर - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०८ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात २ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2022 : विटेवर साकारली विठ्ठलाची प्रतिमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.