ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजार शब्दांमुळे प्रतिमा मलीन, अपक्ष आमदारांची खंत

राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha Election 2022 ) घोडेबाजार होणार, अशा चर्चेला ऊत आला आहे. अपक्ष आमदारांनी ( Independent MLAs ) यावर आक्षेप घेतला असून यामुळे प्रतिमा मलिन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपला पाठिंबा न देता महाविकास आघडीसोबत ( Mahavikas Aghadi ) राहणार, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

बैठक
बैठक
author img

By

Published : Jun 8, 2022, 6:58 AM IST

Updated : Jun 8, 2022, 7:06 AM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha Election 2022 ) घोडेबाजार होणार, अशा चर्चेला ऊत आला आहे. अपक्ष आमदारांनी ( Independent MLAs ) यावर आक्षेप घेतला असून यामुळे प्रतिमा मलिन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपला पाठिंबा न देता महाविकास आघडीसोबत ( Mahavikas Aghadi ) राहणार, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

बोलताना आमदार जोरगेवार

विधानसभेतून राज्यसभेत जाणाऱ्या सहा जागांसाठी पैकी सहावी जागा छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या संख्याबळावर अवलंबून आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची भेट घेतली. तर अनेकांशी संपर्क साधल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर विकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या सर्वच पक्षाच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ), एच के पाटील आदी वरीष्ठ नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. छोटे व अपक्ष आमदारांनी आपल्या भूमिका यावेळी स्पष्ट केल्या.

केंद्र सरकारने कामगार शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण घेतले आहेत. खासगीकरणाच्या घातलेला घाट यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षनेतृत्वाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असे आमदार विनोद निकोले ( MLA Vinod Nikole ) यांनी सांगितले. तसेच आघाडीतील पक्षांतर्गत नाराजी सध्या नाही. मात्र, निधींबाबत काही तक्रारी होत्या. ती राज्यसभा निवडणुकीचा विषय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणूक संपल्यानंतर आर्थिक वर्षातील निधी देण्याबाबत तत्काळ निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिल्याचे निकोले यांनी सांगितले.

घोडा बाजार शब्दाला होता आक्षेप - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. तेव्हा माझ्या भूमिकेचे त्यांनी कौतूक केले. तसेच हा शब्द आला कुठून आणि कोणी आणला माहित नाही. एखादा नेता तयार व्हायला अनेक वर्षे जातात. त्यामुळे प्रसारमाध्यमातून घोडेबाजार होऊन छोटे पक्ष व अपक्ष आमदारांना खूप काही मिळणार, ही भूमिका दाखवली जाते. यातून अपक्ष आमदारांची प्रतिमा मलिन होत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार ( MLA Kishor Jorgewar ) यांनी म्हटले. सातत्याने घोडेबाजार शब्द प्रयोग करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली.

गीता जैन, देवेंद्र भुयार, आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, नरेंद्र भोंडकर, शामसुंदर शिंदे, संजय शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल आणि राजकुमार पटेल हे आमदार बैठकीला उपस्थित होते. या सर्व आमदारांनी एकमताने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा

Last Updated : Jun 8, 2022, 7:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.