ETV Bharat / city

धारावीत ५८, दादरमध्ये ४७ तर माहीममध्ये ७५ नव्या रुग्णांची नोंद

गुरुवारी दिवसभरात धारावीत ५८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी प्रमाणेच दादरमध्ये ४७ तर माहीममध्ये ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील ६० ते ७० च्या खाली घसरलेली धारावीतील सक्रीय रुग्णांची संख्या आता २८५ वर पोहचली आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Mar 25, 2021, 7:14 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. आज गुरुवारी दिवसभरात धारावीत ५८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी प्रमाणेच दादरमध्ये ४७ तर माहीममध्ये ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील ६० ते ७० च्या खाली घसरलेली धारावीतील अॅक्टीव रुग्णांची संख्या आता २८५ वर पोहचली आहे. दादरमध्ये ४२८ तर माहिममध्ये ५३७ अॅक्टीव रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिका सतर्क झाली असून नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

धारावी सहावेळा शून्यावर -

मागील वर्षीच्या मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरु केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले. जुलै - ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोनअंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अॅक्टिव रुग्णांची संख्याही घटली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ ला दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा आणि २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

धारावीत २८५ सक्रीय रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असताना मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. २ फेब्रुवारीला मुंबईभरातील दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून येत होते. ही रुग्णसंख्या आता ५१८५ वर पोहचली आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोकेवर काढले आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत सलग रुग्णसंख्या वाढते आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती, आज धारावीत ५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत रुग्णांची संख्या ४५८९ वर पोहचली आहे. यातील ३९८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २८५ अॅक्टीव रुग्ण आहेत.

माहीममध्ये ५३७ सक्रिय रुग्ण -

मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर आणि माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहीमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आतापर्यंत ५६५० रुग्ण आढळले. यातील ५०५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे येथे ४२८ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिमध्ये आतापर्यंत रुग्णांची संख्या ५६८८ वर पोहचली आहे. यातील ४९९६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. येथे ५३७ सक्रीय रुग्ण आहेत.

५८२२ धारावीकरांना लस -

मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतरही धारावीमधील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी महापालिकेने धारावीत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीत दिवसाला १ हजार लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. फेरीवाले, दूधवाला, दुकानदार आदी ज्या लोकांचा नागरिकांशी रोज संपर्क येतो अशा लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत ५८२२ धारावीकरांना लस देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.