ETV Bharat / city

धक्कादायक: लॉकडाऊन काळात मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेत वाढ - girls physical abuse case in Mumbai

संचारबंदी काळात अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जुलै महिन्यात घडलेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची संख्या अधिक आहे.

mumbai
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 17, 2020, 3:11 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली. याचा परिणाम मुंबईत घडणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांवर सुद्धा पाहायला मिळत आहे. जून २०२० च्या तुलनेत जुलै २०२० मध्ये मोठ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुलै महिन्यात घडलेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार अधिक घडले आहेत. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..

आर्थिक राजधानी मुंबईत जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणी , चोरी बलात्कार , विनयभंग सारख्या मोठ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानुसार समोर येत आहे. जुलै २०२० या महिन्यात मुंबई शहरातील ९४ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल ८,८२७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. ज्यात तब्बल ७,६४४ प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. मात्र जून २०२० महिन्यात मुंबईत ५,७९७ मोठे गुन्हे घडले असून ४,७९७ गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला होता.

जुलै महिन्यात घडलेले मोठे गुन्हे..

जुलै महिन्यात मुंबई शहरात एकूण १० खुनाचे गुन्हे नोंदविण्यात आले असून, खुनाच्या प्रयत्नाचे १८ गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. दरोड्याचे ३ गुन्हे मुंबईत जुलै महिन्यात घडले असून , रॉबरीचे ३४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. खंडणीची १२ गुन्हे या महिन्यात दाखल असून घरफोडीचे १७६ गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे. चोरी होण्याचे २१० गुन्हे , वाहन चोरोची २४१ गुन्हे जखमी करण्याचे २२४ गुन्हे मुंबई पोलिसांनी या काळात नोंदविले आहेत. मुंबई २४ दंगलीचे गुन्हे घडले असून बलात्काराचे ४८ गुन्हे , विनयभंगाचे ८४ तर इतर प्रकरणात ७,७३८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले..

मुंबई शहरात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जानेवारी २०२० ते जुलै २०२० या काळात मुंबईत ३३,६७४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ज्यात तब्बल २६,९३४ गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे. गेल्या ७ महिन्यात बलात्काराच्या ३७७ गुन्ह्यांची नोंद झाली असून विनयभंगाच्या ९८५ गुन्ह्यांची मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ३३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले असून १५ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.