ETV Bharat / city

उत्तर मध्य मुंबईत मताच्या वाढलेल्या टक्केवारीने कोणाचे गणित बिघडणार?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपच्या पुनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांची खरी लढत आहे.

काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन
author img

By

Published : Apr 30, 2019, 11:41 PM IST

मुंबई - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघात मतदान झाले. यापैकी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात ५२.८४ असे सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झाली. मात्र, मागील २००९ आणि २०१४ मधील २ लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी लक्षात घेतली तर यंदा त्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसते. ही वाढ समाधानाची बाब असली तरी या मतदार संघातील काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांपैकी कोणाचे गणित बिघडवणार हे यातून ठरणार आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपच्या पुनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांची खरी लढत आहे. या मतदार संघात एकुण ६ विधानसभा मतदार संघ येतात. यात वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला, चांदिवली, विलेपार्ले हे मतदार संघ येतात. या मतदार संघात सोमवारी झालेल्या मतदानादरम्यान सर्वाधिक मतदान हे वांद्रे, चांदिवली, कुर्ला, कलिना या विधानसभा मतदार संघात झाले. या मतदारसंघातील मतदारांवरच लोकसभेच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित ठरत असते. त्यामुळे झालेल्या मतदानावरून यावेळी मुख्य लढत ही काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यातच झाली असल्याचे दिसून आले.

उत्तर मध्य मुंबईत मताच्या वाढलेल्या टक्केवारीने कोणाचे गणित बिघडणार?

इतर उमेदवारांचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसला तरी भाजपने मात्र बूथस्तरावर केलेल्या नियोजनाचा प्रभाव ठिकठिकाणी दिसून आला. अनेक ठिकाणी भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांसोबत इतर कार्यकर्त्यांनी कलिना, विलेपार्ले, वांद्रे पश्चिम भागातील मतदारांना घराघरात जाऊन मतदानांसाठी आणण्याचे काम केले. यामुळेच विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात ६१.०२ टक्के इतक्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. याच परिसरात शिवसेना, भाजपचे आमदार, नगरसेवकांनीही मोठी भूमिका बजावली असल्याने पूनम महाजन यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

याउलट काँग्रेसची ताकत असलेल्या चांदिवली विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजेच ५०.७९ टक्के मतदानांची नोंद झाली आहे. तर मुस्लीम बहुल असलेल्या कुर्ला विधानसभा मतदार संघात ५१.२९ टक्के मतदान झाले असले तरी यावेळी अपेक्षेप्रमाणे मुस्लीम मतदार बाहेर पडला नसल्याने त्याचा मोठा फटका हा काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि इतर मुस्लीम पक्षाच्या उमेदवारांनी ही मते मिळवल्याने त्याचाही फटका काँग्रेसला बसू शकतो. काँग्रेसच्या बाजूने मतदार असतानाही काँग्रेसची यंत्रणा ही ठिकठिकाणी कमी पडली. तर त्याचाच फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

अशी आहे मतदानाची टक्केवारी
चांदिवली ५०.७९
कलिना ५५.१०
कुर्ला ५१.२९
वांद्रे (पूर्व) ५२.७४
वांद्रे (प.) ५२.४५
विलेपार्ले ६१.०२

Intro:उत्तर मध्य मुंबईत मताच्या वाढलेल्या टक्केवारींने कोणाचे गणित बिघडणार ?Body:उत्तर मध्य मुंबईत मताच्या वाढलेल्या टक्केवारींने कोणाचे गणित बिघडणार ?
(फाईल फुटेज वापरावेत)
मुंबई, ता. ३० :
काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत मुंबई उत्तर-मध्ये लोकसभा मतदार संघात ५२.८४ असे सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झाली. मात्र मागील २००९ आणि २०१४ मधील दोन लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी लक्षात घेतली तर यंदा त्यात पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसते. ही वाढ समाधानाची बाब असली तरी या मतदार संघातील काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारांपैकी कोणाचे गणित बिघडवणार हे यातून ठरणार आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या पुनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांची खरी लढत आहे. या मतदार संघात एकुण सहा विधानसभा मतदार येतात. यात वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला, चांदिवली, विलेपार्ले हे मतदार संघ येतात. या मतदार संघात काल झालेल्या मतदानादरम्यान सर्वाधिक मतदान हे वांद्रे, चांदिवली, कुर्ला, कलिना या विधानसभा मतदार संघात झाले. या मतदारसंघातील मतदारांवरच लोकसभेच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित ठरत असते. त्यामुळे झालेल्या मतदानावरून यावेळी मुख्य लढत ही काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपाच्या पूनम महाजन यांच्यातच झाली असल्याचे दिसून आले. इतर उमेदवारांचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसला तरी भाजपाने मात्र बूथस्तरावर केलेल्या नियोजनाचा प्रभाव ठिकठिकाणी दिसून आला. अनेक ठिकाणी भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांसोबत इतर कार्यकर्त्यांनी कलिना, विलेपार्ले वांद्रे पश्चिम, वांद्रे पश्चिम भागातील मतदारांना घराघरात जाऊन मतदानांसाठी आणण्याचे काम केले. यामुळेच विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात 61.02 टक्के इतक्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. याच परिसरात शिवसेना,भाजपाचे आमदार, नगरसेवकांनीही मोठी भूमिका बजावली असल्याने पूनम महाजन यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. याउलट काँग्रेसची ताकत असलेल्या चांदिवली विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजेच 50. 79 टक्के मतदानांची नोंद झाली आहे. तर मुस्लिम बहुल असलेल्या कुर्ला विधानसभा मतदार संघात 51.29 टक्के मतदान झाले असले तरी यावेळी अपेक्षेप्रमाणे मुस्लिम मतदार बाहेर पडला नसल्याने त्याचा मोठा फटका हा काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि इतर मुस्लिम पक्षाच्या उमेदवारांनी ही मते मिळवल्याने त्याचाही फटका काँग्रेसला बसू शकतो. काँग्रेसच्या बाजूने मतदार असतानाही काँग्रेसची यंत्रणा ही ठिकठिकाणी कमी पडली. तर त्याचाच फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे.
---
अशी आहे मतदानाची टक्केवारी
चांदिवली                   50.79
कलिना                  55.10         
कुर्ला                           51.29
वांद्रे (पूर्व)                  52.74
वांद्रे (प.)                  52.45
विलेपार्ले                  61.02
Conclusion:उत्तर मध्य मुंबईत मताच्या वाढलेल्या टक्केवारींने कोणाचे गणित बिघडणार ?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.