मुंबई - अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मस्जीद जमीन वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना भवनाजवळ कोणत्याही प्रकारचा कायदा- सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा... अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू
बाबरी मस्जिद-राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाला आहे. वादग्रस्त जमिनीवर श्री रामांचे मंदिर बांधले जाईल, हा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर मुंबई आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे. विशेषतः मुंबई पोलिसांनी शिवसेना भवनाजवळील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.
हेही वाचा... अयोध्या प्रकरणी येणाऱ्या निकालाचे जनता स्वागत करेल - उज्ज्वल निकम