ETV Bharat / city

Mumbai Corona : मुंबईत रुग्णसंख्येत वाढ.. ८३० नवे रुग्ण, ११ रुग्णांचा मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या मुंबई

मुंबईत आज 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1300 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 727 दिवसांवर पोहचला आहे.

corona patients in Mumbai
corona patients in Mumbai
author img

By

Published : Jun 16, 2021, 8:07 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवारी 529 तर मंगळवारी 575 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ झाली आहे. आज 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1300 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 727 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 727 दिवसांवर -

मुंबईत आज 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 18 हजार 513 वर पोहचला आहे. आज 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 227 वर पोहोचला आहे. आज 1300 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 86 हजार 125 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 907 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 727 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 20 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 80 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 29 हजार 588 तर आतापर्यंत एकूण 66 लाख 93 हजार 910 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973, 5 जून ला 866, 6 जून ला 794, 7 जून ला 728, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.