ETV Bharat / city

मुंबईत आठवडाभरात डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ - मुंबईतील कोरोना परिस्थिती

मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या १८ दिवसात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत आठ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. आठवडाभरात डेंग्यूचे ५९ रुग्ण आढळले असून मलेरियाचे तब्बल १९१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सप्टेंबरमधील मलेरिया रुग्णांची संख्या ३९८ तर डेंग्यू रुग्णसंख्या १३९ वर पोहोचली आहे. तर स्वाईन फ्ल्यू व चिकनगुनीया आटोक्यात आल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत आठवडाभरात डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो, स्वाईन फ्ल्यू

author img

By

Published : Sep 20, 2022, 9:23 PM IST

मुंबई - यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या १८ दिवसात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत आठ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. आठवडाभरात डेंग्यूचे ५९ रुग्ण आढळले असून मलेरियाचे तब्बल १९१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सप्टेंबरमधील मलेरिया रुग्णांची संख्या ३९८ तर डेंग्यू रुग्णसंख्या १३९ वर पोहोचली आहे. तर स्वाईन फ्ल्यू व चिकनगुनीया आटोक्यात आल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्येत वाढ - मुंबईमध्ये १ ते १८ सप्टेंबरपर्यंत १८ दिवसात मलेरियाचे ३९८ रुग्ण, लेप्टोचे २७, डेंग्यूचे १३९, गॅस्ट्रोचे २०८, हेपेटायसिसचे ४५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ६ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मलेरियाचे ७८७ रुग्ण, लेप्टोचे ६३, डेंग्यूचे १६९, गॅस्ट्रोचे ४६७, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर एच १ एन १ च्या १८९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये मलेरियाचे ६०७ रुग्ण, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे २५६, गॅस्ट्रोचे २४५, हेपेटायसिसचे २८, चिकनगुनियाचे ७ तर एच १ एन १ च्या ९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे १ रुग्णाचा मृत्यू झाला होता.

या आजारामुळे झाले मृत्यू - २०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यू मुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लू बाबत अशी घ्या काळजी - मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे अन्यथा त्याचा मृत्यू होऊ शकतो असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

रुग्णालयांना भेट द्या असे आवाहन - गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून पुढेही रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या चाचण्या करण्यात येणार असून तसे निर्देश खाजगी रुग्णालयांना दिल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे साचलेल्या पाण्यात जाऊ नका. साचलेल्या पाण्यात गेले असल्यास संबंधितांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सी आणि अझीरोमायसिन ही औषधे घ्यावीत. ताप आला असल्यास स्वता औषध न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इतर माहितीसाठी जवळच्या हेल्थ पोस्ट, दवाखाने आणि रुग्णालयांना भेट द्या असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

आठ दिवसांतील रुग्ण वाढ
मलेरिया - १९१
डेंग्यू - ५९
गॅस्ट्रो - ८७
लेप्टो - ९
कावीळ - ३१
स्वाईन फ्ल्यू - ६
चिकनगुनीया - ६

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.