ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या बँकेतील ठेवीत वाढ, ८० हजार ३४२ कोटींच्या ठेवी

author img

By

Published : Jun 9, 2021, 9:55 AM IST

मुंबई महापालिकेच्या विविध बँकाधील मुदत ठेवी या एप्रिल २०२१ च्या प्रारंभी ७८ हजार कोटी रुपयांच्या होत्या. त्यावर १ हजार ५९७ कोटी ३९ लाख रुपयांचे व्याज मिळाल्याने एकाच महिन्यात रक्कम थेट ८० हजार ३४२ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये सोयी-सुविधा देण्याचे काम महापालिका करते. मुंबई महापालिकेला श्रीमंत महापालिका असेही संबोधले जाते. अशा या श्रीमंत महापालिकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असून, सध्या विविध बँकांमधील ठेवीची रक्कम ८० हजार ३४२ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे.

ठेवी मोडून कोरोनावर खर्च

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यावर जानेवारी २०२१ मध्ये नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले. फेब्रुवारी २०२१ च्या मध्यापासून पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णसंख्या वाढू लागली. या दरम्यान लॉकडाऊन असल्याने पालिकेला कराद्वारे मिळणारे उत्पन्न बंद झाले होते. रुग्णांना सोयी-सुविधा देताना, तसेच त्यांच्यावर उपचार करताना मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात २५०० कोटीहून अधिक निधी खर्च झाला आहे. हा खर्च पालिकेच्या बँकेमधील ठेवी मोडीत काढून करण्यात आला आहे.

ठेवींमध्ये वाढ

मुंबई महापालिकेच्या विविध बँकाधील मुदत ठेवी या एप्रिल २०२१ च्या प्रारंभी ७८ हजार कोटी रुपयांच्या होत्या. त्यावर १ हजार ५९७ कोटी ३९ लाख रुपयांचे व्याज मिळाल्याने एकाच महिन्यात रक्कम थेट ८० हजार ३४२ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे. या एकूण ८० कोटी रुपयांमध्ये २५ टक्के रक्कम ही कामगारांना निवृत्तीनंतर देय असणारी आहे. काही रक्कम ही कंत्राटदारांच्या अनामत रकमेशी निगडित आहे. तर उर्वरित रक्कम ही पालिकेने प्रस्तावित केलेले पाणी प्रकल्प, एसटीपी प्रकल्प, कोस्टल रोड प्रकल्प आदी मोठया प्रकल्पांच्या खर्चासाठी ठेवण्यात आलेली आहे.

हेही वाचा - एमएमआरडीएचा पावसाळ्यातील नियंत्रण कक्ष कार्यरत

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.