ETV Bharat / city

Big Breaking : आर्यनसाठी जुही चावला झाली जमानतदार - etv bharat live

ब्रेकींग न्यूज
ब्रेकींग न्यूज
author img

By

Published : Oct 29, 2021, 9:22 AM IST

Updated : Oct 29, 2021, 9:16 PM IST

21:11 October 29

पोपटाचा धंदा देवेंद्र फडणवीसांचा, नवाब मलिक यांचा विरोधीपक्ष नेत्यांना टोला

नागपूर - पोपटाचा धंदा माझा नाही देवेंद्र फडणवीसांचा, पोपट चिठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करत असतात. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना असा खरमरीत टोला राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. नागपूर विमानतळावर पत्रकार वार्तालापात एका प्रश्नाच्या उत्तरात मलिक म्हणाले, 'ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात, नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही.'   

19:56 October 29

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तक्रारीवर ७ दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे पत्र लिहिले आहे. अलीकडेच त्यांच्या जात प्रमाणपत्रांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी आयोगाकडे धाव घेतली.

19:06 October 29

विरार - टॅंकरची दुचाकीला धडक

  • तरुण अपघातात गंभीर जखमी
  • वसई विरार मधील बेकायदेशीर टॅंकरचा प्रश्न ऐरणीवर

19:03 October 29

देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रीयेसाठी 1 हजार 677 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक

नांदेड - देगलूर विधानसभा पोट निवडणूकीचे मतदान शनिवार  30 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने 1 हजार 648 कर्मचारी आणि 29 क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक केली आहे, असे देगलूर निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेत 1 लाख 54 हजार 92 पुरुष मतदार, तर 1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

18:38 October 29

नागपूर - शहरातील सर्वात बदनाम वारंगणांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या गंगा जमुना येथे मिळाले दोन भुयार  

  • पोलिसांच्या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा वापर केला जात होता
  • वेश्याव्यवसाय मुलींना ओढल्यानंतर त्यांच्यावर अमानवी अत्याचार करण्यासाठी या भुयारांमध्ये मुलींना डांबून ठेवले जात असल्याची शक्यता
  • राजस्थान येथील मुलीची तिच्या नातेवाईकांनी विक्री केली होती. एका ग्राहकांच्या मदतीने त्या मुलीने गंगा जमुना वस्तीतून पळ काढला होता. त्यानंतर त्या मुलीने लकडगंज पोलिसांना या भुयाराची माहिती पोलिसांना दिली. याआधारे पोलिसांनी भुयार शोधून काढले आहेत.

18:38 October 29

मुंबई - प्रभाकर साहिलने जे मीडियावर टाकलं होतं. त्यासाठी एक कमिटी चौकशीसाठी तयार केली होती.

- चौकशी केली जातीय

- प्रभाकर साहिलच्या चौकशीसाठी आम्ही प्रयत्न केला

- त्यांनी चौकशी साठी सहभागी व्हावे

- त्यांची चौकशी केल्या शिवाय ठोस पुरावे येत नाहीये

- के.पी गोसावी कस्टडी मध्ये आहे.आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की, आम्हाला चौकशी साठी ताब्यात द्या

- आम्हाला वाटतंय की लवकरच आम्ही निष्कर्ष पर्यंत पोहचेल - ज्ञानेश्वर सिंग

16:50 October 29

ठाणे - भिवंडीतील खान कंपाउंड परिसरात एक माथेफेरूने केलेल्या चाकू हल्ल्यात दोघांची हत्या तर चार जण गंभीर जखमी

  • जखमींमध्ये एक महिला व तीन मुलांचा समावेश
  • हल्लेखोरास जमावाने पकडून शांतीनगर पोलिसांच्या केले स्वाधीन
  • अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्लेखोराचे नाव
  • परिसरात तणाव

16:50 October 29

आर्यनसाठी जुही चावला झाली जमानतदार

  • अभिनेत्री जुही चावला आर्यन खानच्या गॅरेंटेड म्हणून जामिनाचा बाँड भरत आहेत.

16:16 October 29

आर्यनला घेण्यासाठी 'मन्नत'वरुन दोन आलिशान कार आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान थोड्याचे वेळात तुरुंगातून बाहेर येणार आहे. आर्यनला घेण्यासाठी 'मन्नत'वरुन दोन आलिशान कार अर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने निघाल्या आहेत. शाहरुख खान आणि गौरी कारमध्ये असल्याची माहिती मिळत आहे

15:47 October 29

आर्यन खानची बेल ऑर्डर -

मुंबई - उच्च न्यायालयात ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानची एक लाखाच्या जाख मुचलक्यावर सुटका करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन आदेश निघाला आहे. साडेपाच वाजेपर्यंत कारागृहात आदेश (ऑर्डर) आली तर आजच आर्यन खानची सुटका होणार आहे. 

15:36 October 29

मुंबई - मुंबई पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 20 हजार रुपये बोनस जाहीर

  • मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय
  • आरोग्य सेविकांना 5500
  • माध्यमिक शिक्षकांना 10000 रुपये
  • 2016 मध्ये नेमणूक झालेल्या सिएचव्ही वर्करना 5500 दिवाळी भेट, कामगार संघटनांची माहिती

15:31 October 29

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

15:14 October 29

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू - संजय राऊत

  • शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार
  • महाराष्ट्रात कोणावरही अन्याय होणार नाही
  • मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली
  • क्रांती रेडकर इतर नेत्यांना भेटल्या
  • न्याय-अन्याय यावर चर्चा सुरू आहे
  • महाराष्ट्राला सहकार चळवळींचा मोठा इतिहास

11:52 October 29

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे - देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक दिवसभर काही तरी बोलत असतात, त्यांना दुसरे कामही नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देण्याचे काही काम नाही. समीर वानखडे हा भाजपकजा पोपट आहे, त्याच्यात भाजपचा जिव अडकला आहे, यावर बोलतांना ते म्हणाले राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे आहे न, तुमच्यासाठी महत्वाचे असतील आमच्यासाठी नाही. असे म्हणत इतर प्रश्नांची उत्तर न देता निघून गेलेत.

11:43 October 29

मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता सायको किलर

रमण राघव, बियर मॅन नंतर मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत. मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता सायको किलर. अवघ्या 15 मिनिटात दगडाने ठेचून दोन जणांची हत्या करणाऱ्या सायको किलरला मुंबई पोलिसांकडून अटक. शनिवारी भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात अवघ्या 15 मिनिटात झाली होती दोघांची हत्या

11:43 October 29

येवला, लासलगाव कांदा लिलाव 10 दिवस बंद

येवला, लासलगाव सह जिल्ह्यातील इतरही कृषी उत्पन्न समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव हे नऊ ते दहा दिवस बंद राहणार आहे. आज शुक्रवार 29 ऑटोबर पासून ते 3 नोव्हेंबर पर्यंत मजुरांन अभावी व्यापाऱ्यांनी दिलेल्या दिलेल्या अर्जानुसार कांदा लिलाव हे बंद असणार आहे. तर 4 नोव्हेंबर पासून ते 6 नोव्हेंबर पर्यंत दीपावली सणानिमित्त बाजार समित्या बंद असल्याने कांदा लिलाव हे होणार नसल्याने असे नऊ ते 10  दिवस कांदा लिलाव बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे एकूणच बघता की दीपावली सणा निमित्त कृषी उत्पन्न बाजर समित्यात कांदा लिलाव होणार नसल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे.

10:23 October 29

25 कोटी डिलप्रकरणी सॅम डिसुजाला NCB चा समन्स

आर्यन खान क्रूस पार्टी डिलप्रकरणी 25 कोटी डिलप्रकरणी सॅम डिसुजाला NCB चा समन्स. NCB दक्षता समितीच्या आज महत्त्वाचा दिवस. चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स. प्रभाकर साईलने लावले होते आरोप

10:11 October 29

स्पार्किंगमुळे दुचाकी वाहन जळून खाक; एक लाख 72 हजार रुपयांचे नुकसान

नंदुरबार - शहादा शहरात बॅटरीवर चालणाऱ्या चालत्या  दुचाकी वाहनात वायरिंग स्पार्किंग झाल्यामुळे नवी गाडी जळून राखरांगोळी झालेली आहे. वाहनाच्या डिक्कीत एक लाख रुपयांसह वाहनाच्या एक लाख 72 हजार रूपयाचे नुकसान  झाले आहे.

09:57 October 29

एकनाथ शिंदेंना अज्ञातांकडून धमकीचे पत्र

शिवसेना नेते, नगरविकासमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना अज्ञातांकडून धमकीचे पत्र. १५ दिवसांपूर्वी पत्र आल्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

09:05 October 29

नांदेडच्या धर्माबाद येथे आयकर विभागाचे पथक दाखल

नांदेड - जिल्ह्यातील धर्माबाद शहरात आयकर खात्याकडून व्यापाऱ्यांची तपासणी सुरू आहे. प्रतिष्ठित व्यापाऱ्याची पहाटेपासून चौकशी सुरू आहे. आयकर खात्याची मोठी टीम तपासणीसाठी दाखल झाली असून धर्माबाद शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घराची व उद्योगांची चौकशी सुरू आहे.

Last Updated : Oct 29, 2021, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.