ETV Bharat / city

वैद्यकीय शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सामावून घ्या, छात्रभारती विद्यार्थी संघटनेची मागणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रौद्ररूप धारण केले आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडू नये यासाठी वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सेवेत घेण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने स्वागत केले आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
author img

By

Published : May 4, 2021, 6:06 PM IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रौद्ररूप धारण केले आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडू नये यासाठी वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सेवेत घेण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने स्वागत केले आहे. तसेच आरोग्याच्या सुरक्षेबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या सर्व विद्यार्थ्यांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सामावून घेतले पाहिजे अशी मागणी केली आहे.

लसीकरण मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे होते, मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले. अशा अनेक चुकीच्या नियोजनामुळे आज आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आहोत. उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आली आहे. कोरोना विरोधातील लढाईला बळकटी मिळावी म्हणून सरकारने वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सेवेत घेण्याचे जाहीर केले असून त्याबाबत विद्यार्थी संघटना म्हणून यासर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटना पुढील मागण्या पंतप्रधान यांच्याकडे करण्यात आले असल्याचे राज्य संघटक सचिन बनसोडे यांनी सांगितले.

मागण्या खालील प्रमाणे

1) केंद्र सरकारने कोविड कामासाठी घेतलेल्या सर्व वैद्यकीय पदवीच्या विद्यार्थ्यांचे तात्काळ प्राधान्याने मोफत लसीकरण करावे.
2) या सर्व विद्यार्थ्यांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सामावून घेतले पाहिजे.

3) सेवा देताना जर का कोणत्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याला सर्व उपचार मोफत देण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे.
4) या सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य विमा (इन्शुरन्स) उतरवला पाहिजे.
5) कोणत्याही विद्यार्थ्याचा दुर्दैवाने सेवा बजावताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.