ETV Bharat / city

BMC Election : मुंबई महापालिका निवडणूक आचारसंहितेपूर्वी उद्घाटनाची लगीनघाई - मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्घाटनांची घाई

मुंबई महानगरपालिकेचा ( BMC Election ) कालावधी संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक लांबणीवर पडली. यामुळे पालिकेने केलेल्या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मोठ्या प्रमाणात होत ( Inauguration Program Due Mumbai Municipal Corporation ) आहे.

Inauguration program
Inauguration program
author img

By

Published : Apr 17, 2022, 8:15 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा कालावधी संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेची निवडणूक ( BMC Election ) फेब्रुवारीमध्ये होणे अपेक्षित होते, मात्र निवडणूक लांबणीवर पडली. यामुळे निवडणूक कधी होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. आता पालिकेने केलेल्या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने निवडणुका लवकरच ( Inauguration Program Due Mumbai Municipal Corporation ) होतील, असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

पालिकेचा कालावधी संपला- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला झाली होती. ९ मार्च २०१७ ला महापौरांची निवड झाली. पालिकेचा ५ वर्षाचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला आहे. याआधी निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि कोरोना आदी कारणांमुळे निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेचा कार्यकाळ संपल्याने आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महिनाभर कार्यक्रम नाही - पालिकेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होतील या अपेक्षेने कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. याच दरम्यान पालिकेने प्रभाग रचना करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला. पण, राज्य सरकारने सर्वच प्रभाग रचना रद्द करून नव्याने करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करेल. तर आयोगाच्या सहकार्याने प्रभाग रचना आणि इतर बाबी राज्य सरकार करेल, असा कायदा विधिमंडळात संमत करण्यात आला आहे. यामुळे गेले महिनाभर पालिकेने केलेल्या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पणाची कामे झाली नव्हती.

पालिका निवडणुकीची चर्चा - नुकतेच राज्य सरकारने सर्व महापालिकांना पत्र लिहून प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश प्राप्त होताच मुंबई महापालिकेने केलेल्या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे कार्यक्रम संपन्न होत आहेत. यामुळे आता लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लवकरच निवडणूक होईल - पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला असला तरी अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. उद्घाटन आणि लोकार्पणांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत केलेली विकास हेच शिवसेना आणि महाविकास आघाडीचे भांडवल आहे. भाजपा नालेसफाईची कामे पाहून गप्प बसणार आहे, असे दिसत आहे. निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता लागू शकते. आचारसंहितेमध्ये कोणतीही उद्घाटनाची कामे होऊ शकत नाहीत. यामुळे आचारसंहिते आधीच उद्घाटनांची कामे केली जात आहेत. यावरून लवकरच महापालिकेची निवडणूक होईल, असा विश्वास पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

या कामांचे उद्घाटन, लोकार्पण - गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर असलेल्या पुलाचे व सरकत्या जिन्याचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राणीबागेत बांधण्यात आलेल्या पिंजरे, सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथील व्हीविंग गॅलरीचे लोकार्पण झाले आहे.

हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.