ETV Bharat / city

Raj Bhavan Program Canceled : लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर राष्ट्रपतींच्या हस्ते होणार दरबार हॉलचे उद्घाटन कार्यक्रम रद्द

author img

By

Published : Dec 8, 2021, 8:03 PM IST

Updated : Dec 8, 2021, 8:18 PM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते या हॉलचे आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु कर्नाटक, कून्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त ( Army Helicopter Crash ) झाल्याने हा कार्यक्रम रद्द ( Inaugural Event Canceled ) करण्यात आल्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केली.

Raj Bhavan Program Canceled
Raj Bhavan Program Canceled

मुंबई - मुंबईतील राजभवनच्या जुन्या दरबार हॉलच्या ( Old Darbar Hall Program Raj Bhavan ) जागेवर आता ७५० आसनक्षमता असलेला नवा दरबार हॉल बांधून पूर्ण झाला असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते या हॉलचे आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु कर्नाटक, कून्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त ( Army Helicopter Crash ) झाल्याने हा कार्यक्रम रद्द ( Inaugural Event Canceled ) करण्यात आल्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केली. या हॉलच्या उद्घाटनासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूविद्य पत्नी सविता कोविंद यांनी आज सिद्धीविनायक मंदिरात दर्शन ( Savita Kovind visited Siddhivinayak Temple ) घेतले. यावेळी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचे पारंपारीक पद्धतीने स्वागत केले.

सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतांना रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद
  • ऐतिहासिक असा दरबार हॉल

ज्या हॉलने पारतंत्र्यातील ब्रिटिशांचे दरबार पहिले तो हॉल एका सशक्त लोकशाहीतील स्थित्यंतरे पाहण्यासाठी नव्या दमाने पुनश्च सिद्ध झाला आहे. एका वास्तु पुरुषाचा पुनर्जन्म झाला आहे. अंदाजे २० कोटी रुपये खर्च करून हा हॉल बांधण्यात आला आहे. जवळ जवळ १०० वर्षे ऊन, पाऊस व समुद्रकिनारी उभा असल्याने वादळे व प्रचंड लाटांचे तडाखे सहन केल्यामुळे दरबार हॉलचा वास्तु पुरुष गलितगात्र झाला होता. अनेकदा डागडुजी करूनदेखील त्याची वास्तू खचली, आतील लोखंड गंजले. मध्यंतरी दरबार हॉलला छोटीशी आगदेखील लागली होती. कालांतराने त्याला असुरक्षित म्हणून घोषित केले गेले. दरबार हॉलची आसन क्षमता २२५ होती. कालांतराने ती कमी वाटू लागली व शपथविधी सोहळे राजभवनाच्या हिरवळीवर होऊ लागले. सन २०१७-१८ नंतर दरबार हॉलचा वापर पूर्णपणे थांबवला गेला व पुढे त्या ठिकाणी नवा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. सन २०१८ साली नव्या दरबार हॉलचे भूमीपूजन करण्यात आले. परंतु प्रत्यक्ष बांधकाम २०२० साली सुरू झाले. मात्र करोनाकाळात ते ठप्प होऊन मोठ्या कालावधी नंतर पुन्हा सुरू झाले. आज या ऐतिहासिक हॉलचे उद्घाटन होणार होते, परंतु लष्कराचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले.

  • दरबार हॉलचा पूर्व इतिहास

जॉर्ज सिडनहॅम क्लार्क हे मुंबई राज्याचे गव्हर्नर असताना इंग्लंड चे महाराजे पंचम जॉर्ज हे भारत भेटीवर आलेले पहिलेवहिले सर्वोच्च राष्ट्रप्रमुख होते. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेरी या सुद्धा होत्या आणि त्यामुळे राजशिष्टाराच्या दृष्टीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. पंचम जॉर्ज हे राजपुत्र (प्रिन्स ऑफ वेल्स) असताना देखील राजकुमारी मेरीसह सन १९०५ साली भारतात आले होते. त्यावेळी देखील ते त्यावेळच्या मुंबईच्या 'गव्हर्नमेंट हाऊस' येथे, म्हणजे आजच्या मलबार हिल येथील राजभवन येथील प्रासादात आल्याची नोंद आहे. मलबार हिलच्या गव्हर्नमेंट हाऊस येथे पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी दरबार हॉल बांधण्यात आला. त्याची वास्तुरचना देखील जॉर्ज विटेट यांचीच होती. दरबार हॉल येथे अधूनमधून ब्रिटिश गव्हर्नर्सचे दरबार झाले असावे, परंतु निश्चित असा संदर्भ उपलब्ध आहे तो सन १९३७ साली झालेल्या दरबाराचा. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी आपला कार्यकाळ संपत असताना मुंबईतील शेवटचा दरबार याच दरबार हॉल येथे आयोजित केला होता, अशी नोंद आहे. राज्यपाल मोहम्मद फजल (२००२-२००४) यांनी त्यावेळी दरबार हॉलचे नामकरण कॉन्फरन्स हॉल असे केले. परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यावर हॉलने पुनश्च आपले पूर्वीचे प्रचलित नाव धारण केले. दरबार हॉल याच नावाने हा हॉल आजतागायत प्रसिद्ध आहे.

  • राज्याच्या प्रमुखांचे शपथविधी याच दरबार हॉलमध्ये

राजभवन मुंबईच्या दरबार हॉलमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबईचे नगरपाल (सन २००९ नंतर कुणीही नगरपाल झाले नाही), मुख्य माहिती आयुक्त, लोकायुक्त इत्यादी शपथविधी या ठिकाणी होऊ लागले. शासकीय बैठका, शिष्टमंडळांच्या भेटी, सांस्कृतिक सोहळे, पद्म पुरस्कार विजेत्यांचे सत्कार सोहळे, विविध देशांच्या राजदूतांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी दरबार हॉल हे प्रतिष्ठित ठिकाण म्हणून नावारूपाला आले. डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या काळात दरबार हॉलचे नूतनीकरण करण्यात आले. राजभवनातील दरबार हॉलने जशी सत्ता स्थापनेची लगबग पहिली आहे, तशीच आमदारांची शिरगणती देखील भारतीय रेल्वेला १५० वर्षे झाली. त्या वेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांच्यासह याच दरबार हॉल येथून 'डेक्कन ओडिसीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. मुंबईत भारत-पाकिस्तान डेव्हीस कप मॅचेस ठरल्या असताना लिएंडर पेस, महेश भूपती तसेचपाकिस्तानचे खेळाडू यांच्या उपस्थितीत राज्यपाल एस एम कृष्णा यांनी विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत याच ठिकाणी मॅचेसची सोडत काढली होती. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबासाहेब पुरंदरे यांना याच सभागृहात 'महाराष्ट्र भूषण' प्रदान केला होता.

हेही वाचा - State Govt. Affidavit In SC : ओबीसीला आरक्षणाशिवाय निवडणूक नको, राज्य सरकार देणार सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Last Updated : Dec 8, 2021, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.