मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आज 6,463 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 95 हजार 657 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 23 लसीकरण केंद्रांवर 125 बूथवर 4350 आरोग्य कर्मचारी तर 5025 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 9375 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2727 आरोग्य कर्मचारी तर 3736 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 6463 जणांना लस देण्यात आली. आज 2 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 95 हजार 657 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आतापर्यंत 95,657 लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत परळ येथील केईएम रुग्णालयात 11929, सायन येथील टिळक रुग्णालय 5858, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 8404, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 11907, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1,513, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 12,109, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 12,626, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 10,071, बांद्रा भाभा हॉस्पिटल 4,686, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 748, सेव्हन हिल 4586, गोरेगाव नेस्को 3467 मा हॉस्पिटल 767, कस्तुरबा हॉस्पिटल 396, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 1007, दहिसर जंबो 921, एस के पाटील हॉस्पिटल 991, बीएआरसी 851, एम डब्लू हॉस्पिटल 607, भगवती हॉस्पिटल 663, व्ही दि सावरकर हॉस्पिटल 827, मुलुंड जंबो 671, कुर्ला भाभा 52 अशा एकूण 95 हजार 657 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.