मुंबई- मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण सापडत होते. त्यानंतर आता रुग्णसंख्येत घट होत आहे. गुरुवारी ५ हजार ७०८, शुक्रवारी ५,००८ शनिवारी ३५६८ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी घट होऊन २५५९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या १९ हजार ८०८ सक्रिय रुग्ण आहेत.
२५५० नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आजे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
मुंबईत आज (२३ जानेवारीला) २५५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ३४ हजार ८३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ९५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १९ हजार ८०८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२५ दिवस इतका आहे. मुंबईमधील २४ इमारती सील आहेत. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.५४ टक्के इतका आहे.
८९.४ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या २५५० रुग्णांपैकी २१४२ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ३३७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४० रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,७४१ बेडस असून त्यापैकी ४०११ बेडवर म्हणजेच १०.६ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८९.४ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्येत घट -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९, १९ जानेवारीला ६०३२, २० जानेवारीला ५७०८, २१ जानेवारीला ५००८, २२ जानेवारीला ३५६८, २३ जानेवारीला २५५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत ७ नवे रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज २३ जानेवारीला ७ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत ८५५८ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ७९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १४२ सक्रिय रुग्ण आहेत.