मुंबई - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणतर्फे ५ हजार वीज सहाय्यकांच्या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गावर कुठलाही अन्याय झालेला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. एका तांत्रिक त्रुटीमुळे जाहिरातीत एका वर्गाची पदसंख्या दुसऱ्या वर्गाच्या रकान्यात छापल्या गेली. परंतु ही चूक लक्षात येताच ती लगेच सुधारण्यात आलेली आहे, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणने ९ जुलैला रात्री १०.४० वाजता आपल्या संकेतस्थळावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये चुकीने ओबीसींसाठी केवळ ८१ जागा दर्शविण्यात आल्या होत्या. वस्तुत: आरक्षणाप्रमाणे १५०७ पदे ओबीसींसाठी असायला हवे होते. काही वेळानंतरच ही चूक महावितरणच्या लक्षात आली.