मुंबई: आनंद अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत ( City Cooperative Bank ) 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतले.आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.
No relief to Anand Adsul: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आनंद अडसूळांना दिलासा नाही - Shiv Sena leader Anand Adsul
सिटी सहकारी बँक गैरव्यवहार (City Cooperative Bank Misconduct) प्रकरणात शिवसेना नेते आनंद अडसूळ (Shiv Sena leader Anand Adsul) यांनी अटकपूर्व जामिनासाठी (For pre-arrest bail) केलेल्या याचिकेवर बुधवारी मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष कोर्टात सुनावणी झाली. मात्र यात अडसूळ यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.