मुंबई : मुंबईतील माहीम परिसरात कचराकुंडीमध्ये दोन दिवसांचे बाळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भादंवि कलम 318 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, माहीममधील घटनेनंतर पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाला कचराकुंडीमध्ये टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून चौकशी सुरू : यासंदर्भातील पोलिसांच्या माहितीनुसार, कचराकुंडीमध्ये दोन दिवसांचे बाळ टाकण्यात आल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळी दाखल होत परिसरात तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कचराकुंडीमध्ये बाळ कोणी टाकले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अद्याप या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही आहे. मुंबईतील माहीम परिसरात एका डस्टबिनमध्ये दोन दिवसांचे बाळ सापडले आहे. पोलिसांना सोमवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार,
अशाच प्रकारच्या घटनेचा लावला छडा : या महिन्यामध्ये मरीन ड्राईव्ह चौपटीजवळच्या (A similar incident occurred at Marine Drive) एका बस स्टॉपच्या आडोशाला 15 दिवसांच्या बाळाला सोडून देणाऱ्या मातेला आणि तिच्या भावाला पोलिसांनी अटक केली होती. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपींला शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आली होते. पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी चर्चगेट ते खडवली रेल्वे स्थानकावरील तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून अखेर आरोपी आई आणि तिच्या भावाला मरिन लाइन पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा : मरीन ड्राईव्ह चौपाटीवर 15 दिवसांच्या बाळाला सोडून जाणारे दोघे अटकेत