ETV Bharat / city

BJP OBC Morcha Mitting : भाजप ओबीसी मोर्चाची शनिवारी महत्वाची बैठक, राजकीय आरक्षणाबाबत ठरवली जाणार रणनीती! - BJP meeting in Mumbai

महाविकास आघाडीची ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल झालेल्या बैठकीनंतर आता भाजपने सुद्धा याबाबत ओबीसी मोर्चाची महत्वाची बैठक ( BJP OBC Morcha Mitting ) बोलावली आहे. ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल यावर या बैठकीत चर्चा होणार ( BJP meeting on OBC political reservation ) आहे.

BJP OBC Morcha Mitting
भाजप ओबीसी मोर्चाची शनिवारी महत्वाची बैठक
author img

By

Published : May 6, 2022, 7:57 PM IST

मुंबई - ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर आता पुढची दिशा ठरवण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाची शनिवारी महत्वाची बैठक मुंबईत दादर येथील भाजप वसंत स्मृती कार्यालयात( BJP OBC Morcha Mitting ) होत आहे. भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त अशी ही बैठक ( Important meeting of BJP OBC Morcha on Saturday ) असणार आहे. हे आरक्षण नक्की कोणामुळे रद्द झाले? यासाठी जबाबदार कोणाला ठरवायचे, याबाबत जनजागृती कशी करायची? या संदर्भामध्ये पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची समजली ( Strategies to be decided on political reservation ) जात आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती - ओबीसी मोर्चाचे प्रभारी संजय कुटे व योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार असून या बैठकीला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित असणार आहेत.

ठाकरे सरकारची भूमिका वेट अँड वॉच! - ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तूर्त भूमिका न घेण्याचा ठाकरे सरकारचा सूर दिसत आहे. याबाबत काल महाविकास आघाडी नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या त्यांच्या शासकीय निवास्थानी झालेल्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात संदिग्धता असल्याने त्याबाबत आत्ताच काही भूमिका न घेण्याचे ठाकरे सरकारने ठरवले आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेश च्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पुढील दिशा ठरवावी असा सूर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत घेतल्याचे समजते.

बैठकीत रणनीती आखली जाणार! - महाविकास आघाडीची ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल झालेल्या बैठकीनंतर आता भाजपने सुद्धा याबाबत ओबीसी मोर्चाची महत्वाची बैठक बोलावली आहे. ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. जिथे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे तिथे ओबीसी उमेदवारच देणार ही भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे याबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आता काय भूमिका घ्यायची याची चर्चा या बैठकीत होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर ओबीसीचं आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार असल्याने त्याबाबत जनतेमध्ये कशा पद्धतीने जनजागृती करावी याची रूपरेषाही या बैठकीत ठरवली जाणार आहे. सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे.

हेही वाचा - India Israel Friendship : 'बेस्ट’मधून भारत-इस्त्रायल मैत्रीला उजाळा, बसवर भारत इस्त्रायल मैत्रीचे पोस्टर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.