मुंबई - देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रशासनासह राज्य सरकार देखील चिंतेत आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवत असले, तरीही त्याचा पाहिजे तितका परिणाम होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची एक आढावा बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वाचे निर्णय :
1. राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ.
जनआरोग्य योजनेच्या सर्व अंगीकृत रुग्णालयात हा लाभ मिळणार आहे. कोविड-१९ चा होणारा प्रसार पाहता राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
2. निसर्ग चक्रीवादळ.
वादळाची तीव्रता लक्षात घेऊन किनारपट्टीवरील जिल्ह्यांतील लोकांना आपापल्या घरातच थांबण्याचे आवाहन.
3. मुंबई उच्च न्यायालय विधि समिती व उपसमितीसाठी सचिवपदाच्या निर्मितीस मान्यता. तसेच मुंबईसह नागपूर आणि औरंगाबादसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन पदांची निर्मिती.
4. ठाणे येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापना करण्याचा निर्णय. न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस देखील मान्यता.
5. मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्तीबाबत निर्णय
6. डीएमआयसी प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसी विकासक
हेही वाचा... निसर्ग चक्रीवादळ : कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुण्यातील घाट माथ्यावर उद्या मुसळधार पावसाची शक्यता