ETV Bharat / city

दीड दिवसांच्या गणेशाचे विधीवत विसर्जन, ५० टक्क्यांहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात

मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले होते. रात्री १२ वाजेपर्यंत ४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ३९५ सार्वजनिक, ४०८६४ घरगुती तर १८ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ४१ हजार २७७ मूर्तीपैकी कृत्रिम तलावात २४ हजार २६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात २८३ सार्वजनिक, २४२६९ घरगुती तर १५ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान भाविकांना थेट पाण्यात जाऊन विसर्जन करण्यास बंदी असल्याने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

Immersion of a day and a half Ganpati in Mumbai
दीड दिवसांच्या गणेशाचे विधीवत विसर्जन
author img

By

Published : Sep 12, 2021, 10:08 AM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटातही मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे काल (शनिवार) रात्री उशिरापर्यंत मोठ्या भक्तिभावाने विधिवत विसर्जन करण्यात आले. नैसर्गिक व कृत्रिम तलावात रात्री १२ वाजेपर्यंत ४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी २४ हजार २६९ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. ५० टक्क्यांहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे.

४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन -
मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले होते. रात्री १२ वाजेपर्यंत ४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ३९५ सार्वजनिक, ४०८६४ घरगुती तर १८ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ४१ हजार २७७ मूर्तीपैकी कृत्रिम तलावात २४ हजार २६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात २८३ सार्वजनिक, २४२६९ घरगुती तर १५ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान भाविकांना थेट पाण्यात जाऊन विसर्जन करण्यास बंदी असल्याने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

कोरोना नियमांचे पालन करा -
शुक्रवारी घरोघरी गणपती मंगलमूर्ती विराजमान झाले होते. मुंबईत सुमारे दोन लाख घरगुती मूर्तींची तर १० हजाराहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. दिवसभर गणरायाची भक्ती भावाने पूजा, आरती करीत लहान थोरांनी आपल्या आरोग्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. मुंबईत दीड दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींच्या विसर्जनाकरिता पालिकेने तयारी केली होती. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे करोनाचे सावट असल्याने भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

विसर्जनासाठी पालिकेची तयारी -
मुंबई महानगरपालिकेने ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि १७३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. विसर्जन शांततेत सुरू होते. उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई महानगरपालिका, बेस्ट, विविध गणेशोत्सव मंडळे, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अदानी एनर्जी, एमएमआरडीए आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, होमगार्ड यांना तैनात केले आहे.मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची या उत्सवावर नजर आहे.

नियम धाब्यावर -
मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनीच मूर्तींच्या विसर्जनासाठी जावे असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हर्षद काळे यांनी केले आहे. हा नियम उत्सव काळासाठी बंधनकारक असेल. मात्र आजच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन करताना विसर्जन स्थळांच्या ठिकाणी याचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.