मुंबई - मुंबईत काल सोमवारी गौरी गणेश विसर्जन करण्यास सुरुवात gauri ganapati immersion झाली. आज पहाटे ६ वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. आतापर्यंत ४८०२९ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात mmersion of 48 thousand gauri ganapati in mumbai आले. त्यापैकी १७६१७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. Ganeshotsav 2022
असे झाले विसर्जन -मुंबईत ३१ ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात झाली. आज सोमवारी ५ सप्टेंबरला गौरीसह गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली. ६ सप्टेंबरला पहाटे पर्यंत विसर्जन सुरू होते. पहाटे ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ४२९, घरगुती ४१३४०, गौरी ६२६० अशा एकूण ४८०२९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर सार्वजनिक १७४, घरगुती १५२६५, गौरी २१७८ अशा एकूण १७६१७ मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
अशी केलीय व्यवस्था - श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात केले आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्ष. चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका असणार आहेत. निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने, ४८ निरिक्षण मनोरे, विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था, १५२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था, सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.immersion of 48 thousand gauri ganapati in mumbai till 6 am