ETV Bharat / city

कोविड काळातील उपचारांच्या दरांविरोधात आयएमएचे अनोखे आंदोलन - बॉम्बे नर्सिंग अ‌ॅक्ट अंतर्गत नोंदणी

राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोविड काळासाठी सर्व आजारावरील उपचारांसाठी केलेली दर निश्चिती चुकीची आणि अन्यायकारक आहे, असे म्हणत आयएमएने सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. खासगी रुग्णालयांचे दर, खासगी डॉक्टरांना विमा योजना, डॉक्टरांवरील हल्ले असे एक ना अनेक प्रश्न डॉक्टरांचे आहेत. पण सरकार याकडे लक्षच देत नसल्याचे सांगत आयएमए आक्रमक झाली आहे. सात दिवसापासून विविध माध्यमांतून आंदोलन करत आहे.

आयएमचं सरकारविरोधात अनोखं आंदोलन
आयएमचं सरकारविरोधात अनोखं आंदोलन
author img

By

Published : Sep 15, 2020, 6:40 PM IST

मुंबई - राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोविड काळासाठी सर्व आजारावरील उपचारांसाठी दर निश्चिती केली आहे. पण ही दर निश्चिती चुकीची आणि अन्यायकारक आहे, असे म्हणत आता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार रुग्णालय-नर्सिंग होम्सचे नोंदणी प्रमाणपत्र परत करण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी प्रमाणपत्रधारक डॉक्टर आता हे प्रमाणपत्र परत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल पाठवत आहेत.

खासगी रुग्णालयांचे दर, खासगी डॉक्टरांना विमा योजना, डॉक्टरांवरील हल्ले असे एक ना अनेक प्रश्न डॉक्टरांचे आहेत. पण सरकार याकडे लक्षच देत नसल्याचे सांगत आयएमए आक्रमक झाली आहे. सात दिवसापासून विविध माध्यमांतून आंदोलन करत आहे. पण तरीही सरकार याकडे दुर्लक्षच करत आहे. त्यामुळे आता आयएमएने बॉम्बे नर्सिंग अ‌ॅक्ट अंतर्गत नोंदणी करण्यात आलेले प्रमाणपत्र परत करण्याचे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

ज्या आयएमए डॉक्टरांच्या नावे असे नोंदणी प्रमाणपत्र आहे त्या डॉक्टरांकडून प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति जोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल करत नोंदणी परत केली जात आहे, असेही डॉ भोंडवे यांनी सांगितले आहे. सरकारी दरानुसार आता आम्हाला रुग्णालय-नर्सिंग होम्स चालवणे शक्य नाही. त्यामुळे आता सरकारनेच रुग्णालय-नर्सिंग होम्स चालवावेत, असे म्हणत आयएमएने मेल पाठवण्याचे आंदोलन आजपासून सुरू केले आहे. जास्तीत जास्त मेल पाठवत आपला रोष व्यक्त करण्याचा आयएमएचा प्रयत्न असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.