ETV Bharat / city

Anil Parab : गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले - अनिल परब - अनिल परब किरीट सोमैयांना टोला

एसटीचे 1 लाख कर्मचारी सेवेत आहे. त्यांच्याकडून सदावर्तेंनी एक हजार रुपये प्रमाणे पैसे आकारले आहेत, असा आरोप परिवहन मंत्री अनिल यांनी केला ( Anil Parab Allegation Gunratna Sadavarte ) आहे.

Anil Parab
Anil Parab
author img

By

Published : Apr 11, 2022, 9:49 PM IST

मुंबई - वकील गुणरत्न सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याची तक्रार आहे. चार ते पाच पोलीस स्थानकात सदावर्तेंविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एसटीचे 1 लाख कर्मचारी सेवेत आहे. त्यांच्याकडून सदावर्तेंनी एक हजार रुपये प्रमाणे पैसे आकारले आहेत, असा आरोप परिवहन मंत्री अनिल यांनी केला ( Anil Parab Allegation Gunratna Sadavarte ) आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, 22 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. दोन वर्षात एसटीचे मार्ग विस्कळीत झाले होते. त्यामुळे एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी आज बैठक बोलावली होती. रुट अलायमेंट करायचा होता. त्याबाबत निर्णय झाला आहे.

ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांकडून पैसा गोळा केल्याची तक्रार आहे. चार ते पाच पोलीस स्थानकात सदावर्तेविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 1 लाख कर्मचाऱ्यांकडून एक हजार रुपये प्रमाणे पैसै आकारले. हे पैसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ल्यासाठी वापरले का?, तपासात समोर येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

भाजपा नेते किरीट सोमैयांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्याबाबत विचारले असता परब यांनी म्हटले की, राजभवनाने ने सांगितले पैसे मिळाले नाही. पैसे कुठे गेले याचा तपास पोलीस करत आहेत. जगाला सांगत होते, घोटाळे केले नाही तर लपताय कशाला? मग आता का लपत आहेत, असा टोलाही परब यांनी सोमैयांना लगावला आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.