मुंबई २००३ नंतर शांत झालेल्या दाऊद कंपनीने (dawood company) गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील आपल्या हालचाली कमी केल्याचे दिसत होते. मात्र, आता पुन्हा एकदा डि कंपनी सक्रिय (Dawood Company active) झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर मुंबईत दाऊद टोळी पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी अनुचित प्रकार आढळल्यास (inappropriate activity) दाऊद गँगला ठेचून काढण्याचा पुनरूच्चार पुन्हा (crush the Dawood gang) एकदा केला आहे, ते मुंबईत बोलत होते.
डी कंपनी पुन्हा सक्रिय ? (Dawood company active again?) मुंबईत एनआयएने (NIA) मागील मे महिन्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून तब्बल २९ ठिकाणी छापेमारी केली होती. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकण्यात आले होते. एनआयएच्या या छापेमारीपासून दाऊद इब्राहिमचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डी कंपनीने मुंबईतील आपल्या हालचाली कमी केल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा ही कंपनी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर मुंबईत दाऊद टोळी पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. मुंबईत ड्रग्ज आणि बेकायदेशीर मालमत्तेद्वारे टेरर फंडिंग (terror funding) करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचे सहकारी काम करत आहेत. दाऊद टोळीचे लोक पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या दहशतवादी संघटनांना निधी पुरवत आहेत. त्यामुळे मुंबई आणि परिसरात खंडणी दिली जात आहे. बेटिंग बिल्डरांचा अंमली पदार्थांचा धंदा सुद्धा वाढला असल्याचे सांगितले जात आहे.
रिअल इस्टेट आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून फंडिंग दाऊद पाकिस्तानात असल्याचा भारतीय एजन्सींना विश्वास असला तरी तो पाकिस्तानात नसल्याचे पाकिस्तानकडून सतत सांगितले जात आहे. परंतु, भारताकडून दाऊद पाकिस्तानातच असल्याचे पुरावे अनेकवेळा देण्यात आले आहेत. अशात दाऊदकडून मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया होताना एनआयएच्या तपासात उघड होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचा सुद्धा डी कंपनीशी संबंध असल्याची बाब समोर आली आहे. त्या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दाऊद कुठे ऍक्टिव्ह असला तरी त्याला ठेचून काढण्यात येईल असे विधान केले आहे. तसेच भारतात विशेष करून मुंबईतदाऊद टोळी रिअल इस्टेट आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून फंडिंग करत आहे. दाऊदचा धाकटा भाऊ अनिश, साथीदार छोटा शकील आणि टायगर मेनन हे दाऊदला त्याच्या या कामात मदत करत असल्याची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.