ETV Bharat / city

ST Workers Strike : आंदोलन हिंसक झाले तर सरकार जबाबदार, एसटीचा खासगीकरणाचा डाव - दरेकर - एसटी कर्मचारी संप

एसटी कर्मचाऱ्यांना घरी बसून एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

pravin darekar
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Nov 11, 2021, 7:59 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना घरी बसून एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका, उद्या आंदोलन हिंसक वळणावर आले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असणार असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव -

एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संप आणि संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, तरीही राज्य सरकार कोणतीही मदत करू इच्छित नाही आणि तोडगाही काढू इच्छित नाही, काल परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर अत्यंत तुसड्या पद्धतीने चर्चा झाली. त्यांना युनियनशी चर्चा करणे सोयीचे वाटत आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन कोणताही युनियनचे नसून आता जनतेचे झाले आहे. मात्र, आंदोलन चिरडण्याचा प्लॅन केला जात आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मागण्या तसेच इतर अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करून निर्णय घेणे शक्य आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे अनिवार्य आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न संदर्भात नियोजन करून मार्ग काढता येणेही शक्य आहे. मात्र, राज्य सरकारला यामध्ये स्वारस्य दिसत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा दिलासा द्यायचा नाही अशीच सरकारची भूमिका आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.

हवे असल्यास 105 आमदार आणू-

संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. कालपर्यत ९१८ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की सध्या ब्रिटिश नीती महामंडळाकडून वापरण्यात येत असून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पाठीशी खंभीरपणे उभे आहोत, कालपासून अनेक भाजपचे आमदार आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत आहेत. हवे असल्यास आमचे 105 आमदार आझाद मैदानावर आणू असा इशाराही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

आंदोलन हिंसक झाले तर सरकार जबाबदार-

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, कमी पगारात आज काम करत आहे. या महागाईच्या काळात १२ ते १५ हजारमध्ये एसटी कर्मचारी आपले कसे कुटूंबियांचा उदर्निवाह करणार ? असा प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी सरकारला विचारला आहे. महविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचा फार अंत पाहू नका, उद्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हिंसक झाले तर सरकार जबाबदार असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

एसटीचा खासगीकरणाचा डाव - प्रवीण दरेकर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील खासगी बसधारकांना राज्य सरकारने प्रवासाची परवानगी आणि परमिट दिले आहे. कामगारांच्या मागण्या मान्य करून संप मोडीत काढणे शक्य आहे. राज्य सरकार कोणत्याही पद्धतीची पावले उचलत नाही. त्यामुळे खासगी बसधारकांना मलिदा मिळावा यासाठीच हा सर्व खटाटोप करत आहे. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना घरी बसून एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

हेही वाचा - VIDEO : एस टी कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.