ETV Bharat / city

आदित्य मुख्यमंत्री झाले तर फडणवीसांना काहीही गैर वाटणार नाही - उध्दव ठाकरे

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील काही गैर वाटणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 4, 2019, 8:34 PM IST

मुंबई - आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे, हे शिवसैनिकांचे स्वप्न आहे. यामध्ये काहीही गैर नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील काही गैर वाटणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले. भाजपकडून शिवसेनेला लहान भाऊ म्हणून संबोधले जाते. मात्र, आता लहान-मोठा असा प्रश्न सुटला आहे. भावाचे नाते महत्त्वाचे आहे. आम्ही भाऊ म्हणून एकत्र आलो आहोत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लहान-मोठा या वादावर पडदा टाकला.

आदित्य मुख्यमंत्री झाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील काही गैर वाटणार नाही - उध्दव ठाकरे

जागा वाटपाच्या आकड्यावर सर्वकाही अवलंबून नसते. सर्व गोष्टी सोबत बसून ठरवता येतात, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी शिवसेनेला मिळालेल्या जागा वाटपावर दिले. लोकसभा निवडणुकीवेळी असलेले वातावरण आता महाराष्ट्रात राहिले नाही. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा व महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत.

हेही वाचा - दिग्गजांच्या तिकीट कपातीने मुख्यमंत्र्यांचे आसन बळकट

आदित्य यांनी आत्ताच राजकारणात पाऊल ठेवले आहे. आदित्यचे स्वप्न हे महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याचे आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर उध्दव ठाकरे यांनी दिली.

Intro:मुंबई - भाजपकडून शिवसेनेला लहान भाऊ म्हणून संबोधल जात. मात्र आता लहान मोठा भावाचा प्रश्न सोडवलं आहे. आता भावाचा नात महत्त्वाचे आहे, आम्ही भाऊ म्हणून एकत्र आलो आहेत असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लहान मोठया भाऊ या वादावर पडदा टाकला. Body:जागा वाटपाच्या आकड्यावर सर्वकाही अवलंबून नसत, पुढच्या गोष्टी बसून ठरवता येतात असे स्पष्टीकरण त्यांनी शिवसेनेला मिळालेल्या जागा वाटपावर दिले.
लोकसभेच्या आधीच वातावरण आता महाराष्ट्रात राहील नाही. शिवसेना भाजप उघडपणे सर्व गोष्टी करतात. एकदा गोष्ट ठरलं की करायची अस ठरवून आता आम्ही हिंदुत्ववादाचा मुद्दा व महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत असे उध्दव ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं हे स्वप्न शिवसैनिकांचा आहे यात काही गैर नाही.आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील गैर वाटणार नाही असे स्पष्टीकरण देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत दिले.
आदित्य यांनी आताच राजकारणात पाऊल ठेवलं आहे. पहिलं पाऊल म्हणजे मुख्यमंत्री नव्हे. आदित्यच स्वप्न हे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचं आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर उध्दव ठाकरे यांनी दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.