मुंबई - आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल रविवारी ( आज ) जाहीर होणार आहे. मागिल काही दिवसांपासून विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असे दोघांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.
काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आज आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक किंवा सत्र दोनमधील एकही परीक्षा दिली नसेल तर अनुपस्थित म्हणून निकाल येईल. शाळा सुद्धा प्रिन्सिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून निकाल पाहू शकणार आहे.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाला 9 अतिरिक्त न्यायमूर्ती निवडीला मंजुरी