ETV Bharat / city

Churchgate Station Completes 152 Years : चर्चगेट स्टेशन झाले 152 वर्षाचे; वाचा इतिहास

आज (10 जानेवारी 2022) चर्चगेट स्टेशन 152 वर्षांचे (Churchgate station completes 152 years) झाले आहे.. 10 जानेवारी 1870 रोजी चर्चगेट स्टेशनवरून प्रथम रेल्वे धावली होती. पश्चिम रेल्वेचे अंतिम स्टेशन म्हणून आधी कुलाबा स्टेशन ओळखले जात होते. मात्र, आता हा मान चर्चगेट स्टेशनला (Churchgate station) आहे.

author img

By

Published : Jan 10, 2022, 5:00 AM IST

Churchgate station
चर्चगेट स्टेशन

मुंबई - आज (10 जानेवारी 2022) चर्चगेट स्टेशन 152 वर्षांचे (Churchgate station completes 152 years) झाले आहे.. 10 जानेवारी 1870 रोजी चर्चगेट स्टेशनवरून प्रथम रेल्वे धावली होती. पश्चिम रेल्वेचे अंतिम स्टेशन म्हणून आधी कुलाबा स्टेशन ओळखले जात होते. मात्र, आता हा मान चर्चगेट स्टेशनला (Churchgate station) आहे. चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्टेशन आहे. चर्चगेट स्टेशन मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील (Western Railway Line) टर्मिनस असून पश्चिम मार्ग चर्चगेटला संपतो. चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्टेशनपैकी एक आहे.

  • चर्चगेट स्टेशनला 'चर्चगेट' हे नाव कसे पडले?

मायानगरी मुंबईतील प्रत्येक ठिकाणाच्या नावामागे रंजक कथा ऐकायला मिळतात. चर्चगेट या ठिकाणाच्या नावामागेही एक कथा आहे. मुंबईतील कुलाब्यात असलेले वुड हाऊस चर्च हे अगोदर फक्त कॅथेड्रल चर्च या नावाने ओळखले जात असे. सध्या जिथे चर्चगेट स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर हे चर्च होते. स्टेशनमध्ये येणारी गाडी अगदी चर्चच्या गेटसमोर येऊन थांबत असे. त्यामुळे या चर्चच्या दारात म्हणजेच गेटपर्यंत येणारे स्टेशन म्हणून त्याचे नाव 'चर्चगेट स्टेशन' असे पडले.

कालांतराने या रचनेत बदल झाला. रहदारीसाठी चर्चगेट स्टेशनसमोर रस्ता झाला. त्यामुळे चर्च मागे गेले. त्यानंतर काही काळ हे चर्च भुलेश्वर परिसरात हलवण्यात आले. मग पुन्हा ते चर्चगेट येथील मूळ जागेत आले. मात्र, या भागातील रहदारी वाढत गेल्यामुळे चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची वाहने वाहतुकीसाठी अडथळा ठरू लागली. त्यामुळे पुन्हा चर्चसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. अखेर वुडहाऊस चर्च कुलाब्यामध्ये कायमस्वरूपी हलवण्यात आले. या चर्चमध्ये दडलेली स्टेशनच्या नावाची दंतकथा फादर शेट्टीगर यांच्यामुळे आपल्याला समजली.

  • चर्चगेटचे नाव बदलण्याची मागणी -

अलिकडच्या काही वर्षांत चर्चगेट स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्याच्या विधानसभेपासून संसदेपर्यंत नामांतरणासाठी आवाज उठवण्याची चर्चा होती. 2017 मध्ये मुलुंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात दहिसर येथील भाजपच्या मनीषा चौधरी यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य स्टेशन असलेल्या चर्चगेटचे नाव बदलण्याची मागणी केली होती, ज्याचे अनेकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे हा नामांतरणाचा मुद्दा गाजत आहे.

  • पश्चिम रेल्वेवर आठ नवीन एसी लोकल धावणार -

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेने आणखी आठ एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर प्रथमच एसी लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. यापूर्वी पश्चिम मार्गावर फक्त जलद एसी लोकल चालवल्या जात होत्या. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, एकूण आठ एसी लोकल चालवण्यात येणार आहेत. यातील सात फेऱ्या धीम्या मार्गावर तर एक फेरी जलद मार्गावर चालवली जाईल. या निर्णयामुळे सध्या धावणाऱ्या एसी लोकलच्या एकूण संख्येत वाढ होणार आहे, पश्चिम रेल्वेवर आता १२ ऐवजी २० एसी लोकल धावणार आहेत. एसी लोकलच्या या फेऱ्या वाढवण्यासाठी दोन साध्या लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागतील. चर्चगेट ते वांद्रे स्थानकांदरम्यान या साध्या लोकल धावत होत्या. उर्वरित सहा लोकल सध्याच्या वेळापत्रकात सामावून घेतल्या जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.