मुंबई : आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने No money for wife treatment पतीने मानसिक तणावात Husband suicide to mental stress येऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या Mumbai husband suicide केली. ही घटना अंधेरी परिसरात Husband suicide in Andheri घडली आहे. चंद्रिकाप्रसाद निर्मल वय 50 वर्षे असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी अंधेरी येथील अंबोली पोलिसात आत्महत्येचा गुन्हा Suicide case in Amboli police नोंदविण्यात आला.
आर्थिक तणाव ठरला जीवघेणा- चंद्रिकाप्रसाद निर्मल यांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी गीतादेवी मागील काही दिवसांपासून पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पोटात स्टोन असल्याचे सांगून शस्त्रक्रियेने तो काढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये खर्च येणार होता. पण चंद्रिकाप्रसाद यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नव्हते. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे मानसिक तणावाखाली होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी ग्राहकांच्या कपड्यांना इस्त्री केली व कपडे घेऊन ते निघाले होते. त्यावेळी अंधेरी पश्चिम येथील रेड रोड इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गच्चीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - Achievements75 शिवानी कुमारची संघर्षकथा भारतीय रेल्वेत मशीनिस्ट पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला