ETV Bharat / city

Knife Attack On Wife Mumbai : ट्रेनची वाट पाहत असलेल्या पत्नीवर चाकूने केले सपासप वार; चर्चगेट स्टेशनवर थरार - Knife Attack On Wife Mumbai

पश्चिम उपनगराच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली होती. चर्चगेट रेल्वे स्थानकावर एका ४५ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार (Knife Attack On Wife Churchgate Mumbai) करत तिला गंभीर जखमी केल्याची (husband attack on wife with knife) धक्कदायक घटना घडली आहे.

Knife Attack On Wife Mumbai
Knife Attack On Wife Mumbai
author img

By

Published : Oct 12, 2022, 7:57 PM IST

मुंबई : पश्चिम उपनगराच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली होती. चर्चगेट रेल्वे स्थानकावर एका ४५ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार (Knife Attack On Wife Churchgate Mumbai) करत तिला गंभीर जखमी केल्याची (husband attack on wife with knife) धक्कदायक घटना घडली आहे. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. घटनास्थळी उपस्थित जीआरपी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला जवळच्या जीटी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती रोशन नाईक याला अटक केली आहे. पत्नी हेमा नाईक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. (Latest News from Mumbai) (Mumbai Crime)

आरोपी पतीस अटक- या प्रकरणी आरोपी पती रोशन नाईकला चर्चगेट लोहमार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जखमी हेमा नाईक आणि तिचा पती रोशन नाईक हे पालघरचे रहिवासी असून रविवारी कुलाब्यात एका घरगुती कार्यक्रमासाठी आले होते. दुपारच्या सुमारास हेमा नाईकचे कुटुंबीय आणि रोशन नाईक यांच्यात वाद झाले आणि तो तिथून संतापून निघून गेला.

सपासप वार करून रक्ताचा थारोळ्यात लोळविले- हेमा पालघरला घरी परत जाण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्टेशनला पोहोचली. तिथे गाडीची वाट पाहत असलेल्या रोशन नाईकने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात हेमा जखमी झाल्या आणि जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली. हेमावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.