ETV Bharat / city

लस उपलब्ध नसल्याने केईएम, नायरमधील कोरोना संदर्भातील मानवी चाचण्या रद्द

author img

By

Published : Sep 11, 2020, 6:31 AM IST

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात लंडनमध्ये स्वयंसेवकांवर केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या. मात्र, तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात मानवी चाचण्या सुरू असताना स्वयंसेवकांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यामुळे या चाचण्या बुधवारी तात्काळ बंद करण्यात आल्या.

corona vaccine
कोरोना लस

मुंबई - कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांदरम्यान तिसर्‍या टप्प्यात स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आले. यामुळे बुधवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने व त्यानंतर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनेही चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी केईएम आणि नायर रुग्णालयांना ‘आयसीएमआर’ची परवानगी मिळूनही लसीअभावी या चाचण्या रद्द होणार आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि भारतातील सिरम इन्स्टिट्यूट संयुक्तपणे लस बनवत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात लंडनमध्ये स्वयंसेवकांवर केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या. मात्र, तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात मानवी चाचण्या सुरू असताना स्वयंसेवकांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यामुळे या चाचण्या बुधवारी तात्काळ बंद करण्यात आल्या. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटनेही देशभरातील चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात होणार्‍या मानवी चाचण्या होण्याआधीच रद्द झाल्यात जमा आहे. भारतात दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या होणार होत्या. मात्र, आता या दोन्ही टप्प्यातील चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. केईएममध्ये १६० तर नायरमध्ये १०० चाचण्या होणार होत्या तर देशभरात १७ केंद्रांवर एकूण १६०० चाचण्या होणार होत्या. पुण्यात दोन स्वयंसेवकांवर याची चाचणी झाली होती.

पालिका ‘आयसीएमआर’च्या संपर्कात -
केईएम आणि नायरमध्ये मानवी चाचण्या करण्यासाठी आम्हाला ‘आयसीएमआर’ने परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूटने चाचण्या थांबवल्या आहेत. चाचण्यांसाठी लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, लसच उपलब्ध नसेल तर चाचण्या कशा करणार? मात्र, या चाचण्या रद्द झाल्यात की, नाहीत याबाबत ‘आयसीएमआर’कडून आम्हाला अद्याप काहीही कळवण्यात आलेले नाही. आम्ही ‘आयसीएमआर’च्या सतत संपर्कात आहोत, अशी माहिती पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने 20 जुलैला 'कोविडशिल्ड' या कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जाहीर केले होते. जगभरात विकसित करण्यात येत असलेल्या लसींमध्ये ही लस आघाडीवर आहे. प्रसिद्ध लॅन्सेट सायन्स संस्थेनेही लसीच्या सकारात्मक परिणामांना दुजोरा दिला गेला. व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता तयार होत असून ती सुरक्षित असल्याचे लॅन्सेटने म्हटले होते. त्यामुळे संपूर्ण जगाच्या या लसीकडून आशा लागल्या आहेत. मात्र, अचानक चाचण्या थांबवण्यात येणे, ही चिंतेची बाब आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.