मुंबई - मुंबईतील महालक्ष्मी परिसरात भीषण आग ( huge fire broke out in the Mahalakshmi ) लागली आहे. विठ्ठल निवासला आग लागली असून, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. ही चाळ असल्याने रहिवाशांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान अग्निशमन दलावर होते. मोठे शर्तीचे प्रयत्न करून अग्नशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
दुपारी १२ च्या सुमारास आग लागली - या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. महालक्ष्मी जेकब सर्कल सात रस्ता येथील विठ्ठल निवास इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका घराला दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. आग लागलेली इमारत चाळ असल्याने रहिवाशांमध्ये बाहेर कसे पडावे अशी भीती होती.
कोणीही जखमी झाले नाही - आग लागलेल्या घराच्या बाजूलाच एक घर सोडून एक महिला खिडकीत बसली होती. आगीमधून सुटका होण्याची ती वाट पाहत होती. त्याच वेळी अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचून त्या महिलेला शिडीद्वारे खाली उतरवले. तर आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. या आगीत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आग लागलेल्या इमारतीचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा - New Corona Variant : डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला नव्या व्हायरसची एन्ट्री!