ETV Bharat / city

Job in ED : कशी मिळवायची ईडीमध्ये नोकरी; काय असते पात्रता जाणून घ्या - How to get job in ED

अंमलबजावणी संचालनालय ( Directorate of Enforcement ) म्हणजेच ईडीची जोरदार चर्चा आहे. देशातील बड्या राजकारण्यांनी देखील ईडीचा मोठा धसका घेतला ( ED took big hit ) आहे. ईडी ऑफिसर बनण्याची पात्रता काय (eligibility to become ED officer ) असते ? असे अनेक प्रश्न तरुणाईला पडले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Job in ED
ईडीमध्ये नोकरी
author img

By

Published : Oct 13, 2022, 10:48 AM IST

मुंबई : सध्या देशभरात अंमलबजावणी संचालनालय ( Directorate of Enforcement ) म्हणजेच ईडीची जोरदार चर्चा आहे. देशातील बड्या राजकारण्यांनी देखील ईडीचा मोठा धसका घेतला ( ED took big hit ) आहे. ईडीने नामांकित राजकीय मंडळींना आपल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवून कामाला लावले आहे. मोदी सरकारच्या काळात ईडीच्या कारवाईंचा वेग पाहता ईडी कार्यालयात नोकरी मिळविण्यासाठी काय करावे लागते ? ईडी ऑफिसर बनण्याची पात्रता काय (eligibility to become ED officer ) असते ? असे अनेक प्रश्न तरुणाईला पडले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

मालमत्तेशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे काम ईडी करते : ईडी ही भारतातील एक अतिशय प्रभावी, शक्तिशाली संस्था म्हणून ओळखली जाते. देश आणि परदेशातील कोणत्याही कोट्यवधीच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे काम ईडी करते. ईडीअंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड IAS, IPS इत्यादी रँकच्या आधारे केली जाते. ईडीमध्ये सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी बनण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत होणारी सीजीएल (CGL) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एसएससी सीजीएल (CGL) परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार पदवीधर (ग्रॅज्युएट) असणे आवश्यक आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच काही विशेष पदांसाठी, कमाल वयोमर्यादा केवळ 27 वर्षे आहे.

ग्रुप A मध्ये अशी पदे येतात : ED मध्ये, ग्रुप A, B आणि C साठी अनेक पदांची भरती केली जाते. त्यापैकी काही पदांवर प्रतिनियुक्तीवर तर काही पदांवर पदोन्नती आणि निवड प्रक्रियेच्याआधारे भरती केली जाते. ग्रुप A पदांवर प्रतिनियुक्ती आधारावर भरती केली जाते. ग्रुप A मध्ये विशेष संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक अशी पदे येतात.

ईडीद्वारे वेळोवेळी ग्रुप Cच्या पदांची भरती : ग्रुप Bच्या काही पदांवर पदोन्नतीने किंवा थेट भरती केली जाते. ग्रुप B मध्ये सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी पदासाठी निवड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केली जाते. तसेच दुसरीकडे विविध भरती प्रक्रियेआधारे ईडीद्वारे वेळोवेळी ग्रुप Cच्या पदांची भरती केली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.