ETV Bharat / city

रियाज भाटी हा पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचला? नवाब मलिकांचा सवाल

author img

By

Published : Nov 10, 2021, 1:38 PM IST

रियाज भाटी याला दोन बनावट पासपोर्टसह मुंबई विमानतळावर पकडण्यात आलं होतं. मात्र हे प्रकरणही दाबलं गेलं आणि केवळ दोन दिवसांत रियाज घाटी या सर्व प्रकरणातून बाहेर आला. हे कसं झालं? असा सवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

रियाज भाटी हा पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचला? नवाब मलिकांचा सवाल
रियाज भाटी हा पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचला? नवाब मलिकांचा सवाल

मुंबई : रियाज भाटी हा गुंड अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. दाऊद इब्राहिमसोबत रियाज घाटी याचा थेट संबंध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून अनेक वेळा प्रसारित झाल्या आहेत. रियाज भाटी याला दोन बनावट पासपोर्टसह मुंबई विमानतळावर पकडण्यात आलं होतं. मात्र हे प्रकरणही दाबलं गेलं आणि केवळ दोन दिवसांत रियाज घाटी या सर्व प्रकरणातून बाहेर आला. हे कसं झालं? असा सवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

रियाज भाटी अनेक कार्यक्रमांमध्ये नेत्यांसोबत दिसतो
आताही रियाज भाटी फरार आहे. मात्र रियाज भाटी भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यावेळी दिसला होता. त्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत फोटो आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना त्यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे. माझा कोणत्याही नेत्यांसोबत असलेल्या फोटवर आक्षेप नसून, गुंड तसेच अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या प्रवृत्तीचा व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचतो? तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो कसा काढतो? पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीची स्कॅनिंग केल्याशिवाय त्यांना आत जाऊ दिले जात नाही. अशा परिस्थितीत गुंड प्रवृत्तीची व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते कशी? याबाबत देवेंद्र फडणीस यांनी स्पष्टता आणली पाहिजे. असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

गुंडांच्या माध्यमातून वसुलीचे काम
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना गुंडांना सरकारी पदांवर बसविण्यात आले. यांच्या माध्यमातून वसुलीचे काम सुरू होते. विदेशातून लोकांना फोन केले जायचे. यांच्याकडून खंडणी वसूल केली जायची. या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस मध्यस्थाची भूमिका निभावत होते. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद होते. असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.