ETV Bharat / city

मिशन धारावी : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्तीच्या मार्गावर...

मे महिन्यामध्ये दिवसाला सरासरी ४३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असलेल्या धारावीमध्ये, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसाला सरासरी १९ नव्या रुग्णांची नोंद होत होती. रुग्णसंख्येला आळा घालणाऱ्या या पॅटर्नचे कौतुक केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील केले. इतकेच नव्हे, तर दिल्लीसह अनेक राज्यांना या पॅटर्नचा अवलंब करण्याचा सल्लाही मंत्रालयाने दिला...

author img

By

Published : Jun 29, 2020, 5:58 PM IST

How 'Dharavi Mission' helped Asia's largest slum to achieve victory against Corona
मिशन धारावी : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्तीच्या मार्गावर...

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी ही मुंबईतील कोरोनाचा एक मोठा हॉटस्पॉट मानली मानली जात होती. मात्र गेल्या महिनाभरापासून धारावीमधील कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची घसरण आढळून आली आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे!

मे महिन्यामध्ये दिवसाला सरासरी ४३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असलेल्या धारावीमध्ये, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसाला सरासरी १९ नव्या रुग्णांची नोंद होत होती. रुग्णसंख्येला आळा घालणाऱ्या या पॅटर्नचे कौतुक केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील केले. इतकेच नव्हे, तर दिल्लीसह अनेक राज्यांना या पॅटर्नचा अवलंब करण्याचा सल्लाही मंत्रालयाने दिला.

तब्बल एक लाखांहून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे, दहा लाखांहून अधिक लोक म्हणजेच धारावी! याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात पर्सनल स्पेस असा नाहीच. एका छोट्याश्या खोलीत आठ-दहा लोक ज्याठिकाणी झोपतात, तिथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यास सांगणे हाच मुळाच विनोद आहे. त्यामुळेच, याठिकाणी कोरोनाच्या प्रसाराला आळा घालणे हे सगळ्यात मोठे आव्हान प्रशासनापुढे होते.

लोकांचा विश्वास..

सुरुवातीला लोक कोरोनाला एवढे घाबरले होते, की लक्षणे आढळल्यानंतरही ते स्वतः पुढे येऊन त्याबाबत सांगण्यास कचरत होते. त्यामुले प्रशासनाला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गरजेची असलेली पहिली पायरीच ओलांडता येत नव्हती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली.

हे स्थानिक डॉक्टर, जे बऱ्याच लोकांचे फॅमिली डॉक्टरही होते. त्यामुळे या डॉक्टरांजवळ आपल्या अडचणी, तक्रारी सांगण्यास ते लोक घाबरत नव्हते. त्यानंतर, प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी साधे तापाचे दवाखाने उघडले. जिथे लोक आपल्या तपासणीसाठी येत. यासोबतच वैद्यकीय पथके डोअर-टू-डोअर तपासणीही करत होते.

डॉ. अनिल पाचनेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की आठवडाभरात साधारणपणे ४७,५०० लोकांची स्क्रीनिंग झाली होती. त्यांपैकी सुमारे १,१०० लोकांना प्रशासकीय विलगीकरणात पाठवण्यात आले, तर सुमारे १५० लोकांना (जे नंतरच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळले होते) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धारावीमध्ये योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाला लॉकडाऊनचाही मोठा फायदा झाला. परराज्यातील सुमारे चार लाख स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांमध्ये परतल्यामुळे धारावीमधील जनसंख्या कमी झाली, ज्यामुळे प्रशासनाला अधिक वेगाने काम करता आले. कमी लोकसंख्येमुळे प्रशासानाला स्थानिक दवाखान्यांमधील कोरोना चाचण्या वाढवता आल्या, आणि डोअर-टू-डोअर स्क्रीनिंगही वेगाने करता आले.

स्थानिक विलगीकरण कक्ष..

बृहन्मुंबई महानगरपालिकचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना 'स्थानिक विलगीकरण कक्षां'चे महत्त्व अधोरेखित केले. बीएमसीने धारावीमधील लोकांसाठी झोपडपट्टी परिसरातच विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात आली होती. यामुळे लोकांना अधिक सुरक्षित वाटत होते, आणि मोठ्या प्रमाणात लोक स्वतः चाचणीसाठी पुढे येऊ लागले. आपल्याला जास्त लांब जावे लागणार नाही, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब होती.

यासोबतच, लोकांना घराच्या आणि विलगीकरण कक्षांच्या आत ठेवणे हीदेखील मोठी जबाबदारी पालिकेवर होती. लोक खाद्यपदार्थ घेण्यासाठीही बाहेर येऊ नयेत, यासाठी बीएमसीने सुमारे २१ हजार अन्नाच्या पाकिटांचे वाटप केले. यासोबतच, त्यांच्या इतर गरजांचेही समाधान करण्यात आले, असे दिघावकर यांनी सांगितले.

पोलीस, आणि स्वयंसेवी संस्था..

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, सीआरईडीएआय-एमसीएचआय, भारतीय जैन संघटन अशा अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्रशासानाच्या मदतीसाठी पाऊल उचलले. नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी आणि लोकांना जागरुक करण्यासाठी स्थानिक पोलिसांचे कामही मोलाचे ठरले.

धारावीमधील बहुभाषिक लोकसंख्या पाहता, पोलिसांनी जनजागृती करणारे संदेश विविध भाषांमध्ये रेकॉर्ड करुन प्रसारित केले होते. फिजिकल-सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन होते आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलीस दिवस-रात्र मेहनत करत होते. पोलीस सतत धारावीच्या प्रत्येक गल्लीबोळातून मार्च करत असत.

या सर्व कालावधीमध्ये, धारावीत सुमारे ३३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तसेच एका पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी बळीही गेला. मात्र, तरीही इतरांनी आपला आत्मविश्वास न डळमळू देता आपले कार्य सुरु ठेवले. सर्वांनी एकत्रितपणे कार्य केल्यामुळे, एकमेकांना मदत केल्यामुळे प्रशासनावर एकदम भार आला नाही. या सर्व प्रयत्नांमुळेच आज धारावीमध्ये रुग्णसंख्या एवढ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

हेही वाचा : विशेष मुलाखत : 'खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे आकारल्यास थेट कारवाई करू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.