ETV Bharat / city

या कारणांमुळे आर्यनला मिळाला जामीन, मुकूल रोहतगी यांनी असा केला युक्तिवाद - aryan khan

आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत अमित देसाई आणि मुकुल रोहतगी हे सर्व कायदेतज्ञ न्यायालयात हजर होते. मात्र आज जामीन मिळवून देण्यासाठी मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद अत्यंत महत्वाचा ठरला. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज किंवा त्याने ड्रग्ज घेतल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीही केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता.

आर्यन
आर्यन
author img

By

Published : Oct 28, 2021, 6:29 PM IST

मुंबई- क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. अखेर ज्येष्ठ वकील आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या प्रयत्नांना यश आला आहे.

आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत अमित देसाई आणि मुकुल रोहतगी हे सर्व कायदेतज्ञ न्यायालयात हजर होते. मात्र आज जामीन मिळवून देण्यासाठी मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद अत्यंत महत्वाचा ठरला. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज किंवा त्याने ड्रग्ज घेतल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीही केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता.

सतीश मानेशिंदे यांनी जामीनासाठीचा अर्ज सादर केला होता. मानेशिंदे यांनी संजय दत्त आणि सलमान खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांची प्रकरणे हाताळली आहेत. मात्र, आर्यन खानला जामीन न मिळाल्याने अमित देसाई या दिग्गज वकिलांनी आर्यनच्या कायदेशीर टीममध्ये एन्ट्री घेतली होती. पण त्यानंतरही आर्यनला जामीन मिळू शकला नव्हता.

कोण आहेत मुकुल रोहतगी?
देशातल्या दिग्गज कायदेतज्ज्ञांत मुकुल रोहतगी यांचे नाव घेतले जाते. त्यांचे पिता अवध बिहारी रोहतगी हे पुर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या रोहतगी यांनी योगेश कुमार सभरवाल यांचे ज्युनिअर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. १९९३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांना सीनिअर कौन्सिलचा दर्जा मिळाला.

त्यानंतर १९९९ साली केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना ऑडिशनल सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी देण्यात आली. २००२ साली गुजरात दंगलीनंतर रोहतगी यांनीच सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. पुढे २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुकुल रोहतगींकडे ऑटर्नी जनरल पदाची जबाबदारी सोपवली. १८ जून २०१७ पर्यंत रोहतगी या पदावर होते.

आर्यन खान कारागृहाबाहेर कझी येणार?
मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी दिली आहे.

मुनमुन धमेचा यांच्या वकिलांनी काय माहिती दिली?
न्यायमूर्तींनी प्रकरण ऐकून आम्हाला जामीन दिला आहे, असं वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. कोर्टानं आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज खानला जामीन दिला आहे. आज हायकोर्टानं युक्तिवाद ऐकून तिघांना जामीन दिला आहे. उद्या कोर्टाची सविस्तर ऑर्डर मिळेल, असं वकिलांनी सांगितलं आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर तीन दिवस जामीनासाठी सुनावणी झाली. एनसीबीनं सेशन कोर्टात केलेला युक्तिवाद पुन्हा मुंबई हायकोर्टात केल्याचा दावा मुनमुन धामेचा यांच्या वकिलानं सांगितलं आहे, असं मुनमुन धमेचाचे वकील म्हणाले.

आरोपींना कोणत्या अटींवर जामीन?
साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

जामीनाला एनसीबीचा तीव्र विरोध
एनसीबीची केस अशी आहे की, आर्यनने एकप्रकारे जाणीवपूर्वक अमलीपदार्थ बाळगले होते. त्याचे अमलीपदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत आणि अटकही वैध आहे. तो कटाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी केलीय. एनसीबीचा तपास अजून सुरु आहे. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांच्याकडून करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.