ETV Bharat / city

होर्डिंगच्या माध्यमातून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; पवारांवर टीकास्त्र - social media

होर्डिंगच्या माध्यमातून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; पवारांवर टीकास्त्र, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे हे होर्डिंग आहे. सध्या हे होर्डिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

shivsena
author img

By

Published : Feb 20, 2019, 8:20 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीपूर्वीच आता युती विरूद्ध आघाडी असे सोशल मीडिया वॉर सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे एक होर्डिंग शिवसेना भवनासमोर लावले आहे. मात्र, पोलिसांनी ते होर्डिंग काढताच शिवसेनेने पुन्हा आणखी एक शक्ती प्रदर्शन करणारे भले मोठे होर्डिंग त्या ठिकाणी लावले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे हे होर्डिंग आहे. सध्या हे होर्डिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

माहीम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हे होर्डिंग लावले आहे. होर्डिंगवर शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही सरवणकर यांच्यासोबत फोटो आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना भवनासमोर होर्डिंग लावून भाजपबरोबर केलेल्या युतीची खिल्ली उडवली होती.

सोशल मीडियावर बॅनर वॉर -

शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर शिवसेनेवर टीका करणारे बॅनर व्हायरल केले होते. आता शिवसैनिकांनीही शरद पवारांचा पाठित खंजीर खुपसणारा इतिहास सांगणारा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

undefined

Intro:होर्डिंगच्या माध्यमातून युतीच शिवसेनेने केलं शक्तिप्रदर्शन
मुंबई - लोकसभा निवडणुकीपूर्वीच आता युती विरूद्ध आघाडी असं सोशल मिडीया वाॅर सुरू झालंय.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका करणार होर्डिंग शिवसेनेन शिवसेना भवन इथं लावलं होतं.मात्र पोलिसांनी हें होर्डिंग काढल्यानंतर आता शिवसेनेन होर्डिंगच्या माध्यमातून युतीच शक्तिप्रदर्शन करणार भलं मोठं होर्डिंग लावलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे शिवसेनाभवनासमोर भले मोठे होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. Body:माहीम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हे होर्डिंग लावले आहेत.होर्डिंगवर शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही सरवणकर यांच्यासोबत फोटो आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना भवनासमोर होर्डिग लावून भाजपबरोबर केलेल्या युतीची खिल्ली उडवली होती. Conclusion:शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मिडियावर शिवसेनेवर टिका करणारे बॅनर व्हायरल केले होते. आता शिवसैनिकांनीही शरद पवारांचा पाठित खंजीर खुपसणारा इतिहास सांगणारा बॅनर सोशल मिडीयावर व्हायरल केलांय.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.