ETV Bharat / city

'राहील त्यांचे घर'... गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची महत्त्वाची घोषणा - Home plans slums

मुंबई शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंना संरक्षण देण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. यात भाडेकरू ज्या झोपड्यांमध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी 'राहील त्यांचे घर' अशी योजना लवकरच राबवली जाणार आहे. अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केली.

Housing Minister Jitendra Awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Feb 7, 2020, 3:42 AM IST

Updated : Feb 7, 2020, 6:14 AM IST

मुंबई - शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंना संरक्षण देण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. यात भाडेकरू ज्या झोपड्यांमध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी 'राहील त्यांचे घर' अशी योजना लवकरच राबवली जाणार आहे. अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केली. आव्हाडांच्या घोषणेमुळे मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना त्यांच्या घराचे मालक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच'

गृहनिर्माण मंत्री म्हणून कामकाज हाती घेतल्यानंतर मागील महिन्याभरात ३३ हून अधिक निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी आव्हाड यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहील त्याचे घर ही घोषणा केली.

'जे लोक मुंबईतील झोपडपट्ट्यामधे आपली घरे कायम ठेवून इमारतीमध्ये राहायला गेलेले आहेत आणि जे भाडेकरू अजुनही त्या घरात राहतात, अशा भाडेकरूंना उद्या एसआरए आणि इतर योजना आणल्या गेल्यास ते उघड्यावर येतील. म्हणून त्यांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली जाणार आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही' अशी ठाम भूमिका आव्हाड यांनी मांडली.

हेही वाचा... '... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'

जो भाडेकरू ज्या खोलीत राहतो, त्या खोलीचा तो मालक होईल. यासाठी त्याला ते त्याचे घर म्हणून त्यांची नोंद केली जाईल. यात काहीही बदल केला जाणार नाही. भाडेकरूंना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच यापुढे मुंबईत झोपड्या वाढणार नाहीत. यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हेक्षण सुरू आहे. नवीन झोपडी तयार झाल्यास त्यासाठी अधिकाऱ्यांना, पोलिसांना जबाबदार धरले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धारावीच्या पुनर्विकासाला संदर्भात मुख्य सचिव हे बैठक घेऊन आठवडाभरात निर्णय घेणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील घरांच्या विकासासाठी एफडीए आणले जाणार असून त्यात एसआरए आणि म्हाडाचा 20 टक्के वाटा असेल. येत्या तीन महिन्यात असा एखादा करार केला जाईल असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा... व्हॉटसअपवर 'तिहेरी तलाक' देणाऱ्या पतीला ७ महिन्यानंतर बेड्या

मुंबईतील गृहनिर्माण विकासासाठी व त्यासाठीची लागणारी मोठी गुंतवणूक करण्यासाठी दुबईचा राजपुत्र आणि एम. आर. कंपनीचा मालक मुंबईत पुढील आठवड्यात येणार आहेत. अनेक चाळींच्या विकासासाठी अशा प्रकारची गुंतवणूक होत असेल तर सरकार त्यासाठी सहकार्याच्या भूमिकेत असणार असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Intro:

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहील त्याचे घर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची महत्त्वाची घोषणा

mh-mum-01-ncp-jitendraavad-7201153

(फीड मो जो वर पाठवले आहे.)

मुंबई, ता. ६ :

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंना संरक्षण देण्यासाठी ते ज्या झोपड्यांमध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी 'राहील त्यांचे घर' अशी योजना लवकरच राबवली जाणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली.
आव्हाडांच्या घोषणेमुळे मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे भाडेकरू हे त्याच्या घराचे मालक होणार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गृहनिर्माण मंत्री म्हणून कामकाज हाती घेतल्यानंतर मागील महिन्याभरात ३३ हून अधिक निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी आव्हाड यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहील त्याचे घर ही घोषणा केली.

जे लोक मुंबईतील झोपडपट्ट्यामधे आपली घरे कायम ठेवून इमारतीमध्ये राहायला गेलेले आहेत आणि जे भाडेकरू अजुनही त्या घरात राहतात अशा भाडेकरूंना उद्या एस आर ए आणि इतर योजना आणल्या गेल्यास ते उघड्यावर ये तील, म्हणून त्यांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली जाणार असून त्यात कोणताही बदल केला जाणार नाही अशी ठाम भूमिका ही आव्हाड यांनी मांडली.

जो भाडेकरू ज्या खोलीत राहतो, त्या खोलीचा तो मालक होईल यासाठी त्याला ते त्याचे घर म्हणून त्यांची नोंद केली जाईल, यात काहीही बदल केला जाणार नाही. भाडेकरूंना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच यापुढे मुंबईत झोपड्या वाढणार नाहीत, यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हेक्षण सुरू आहे, नवीन झोपडे तयार झाल्यास त्यासाठी अधिकाऱ्यांना, पोलिसांना जबाबदार धरले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धारावीच्या पुनर्विकासाला संदर्भात मुख्य सचिव हे बैठक घेऊन आठवडाभरात निर्णय घेणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील घरांच्या विकासासाठी एफडीए आणलं जाणार असून त्यात एस आर ए आणि म्हाडाचा 20 टक्के वाटा असेल. येत्या तीन महिन्यात असा एखादा करार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील गृहनिर्माण विकासासाठी व त्यासाठीची लागणारी मोठी गुंतवणूक करण्यासाठी दुबईचा राजपुत्र आणि एम आर कंपनीचा मालक मुंबईत पुढील आठवड्यात येणार आहेत. अनेक चाळींच्या विकासासाठी अशा प्रकारची गुंतवणूक होत असेल तर सरकार त्यासाठी सहकार्याच्या भूमिकेत असणार असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.Body:मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहील त्याचे घर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची महत्त्वाची घोषणाConclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 6:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.