मुंबई - कोरोना काळात आणि राज्यात कायद्यानुसार डान्सबार वर बंदी असतानाही मुंबईत आणि बोरिवली ते काशिमीरा भागात डान्सबार पोलिसांना हप्ते देऊन सर्सास सुरु आहेत. हुक्का पार्लरचा यात समावेश असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. मुंबई महानगर प्रदेशासह सर्वच ठिकाणच्या डान्स बार आणि हुक्का पार्लरवर आजपासूनच कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. राज्यातील डान्स बार, हुक्का पार्लर यामुळे रडारवर येणार आहेत.
पोलिसांकडून खतपाणी-
राज्यातील अनेक ठिकाणी रात्रभर हे डान्सबार सुरु असतात. या बारमुळे त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जात आहे. या डान्स बार चालकांना प्रश्न विचारल्यास पोलीस अधिकारी हफ्ता घेत असल्याचे ते सांगतात, असा मुद्दा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर निरंजन डावखरे आणि रामदास कदम यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. काशीमीरा ते बोरिवलीमध्ये अशी अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांकडूनच अशा व्यवसायाला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबिनाची कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.
थेट गृहमंत्र्यांनाच हप्ता-
भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी घोडबंदर येथील हुक्का पार्लरचा प्रश्न मांडला आहे. या हुक्का पार्लरच्या मागे गृहमंत्र्यांना हफ्ता दिल्याचे हुक्का पार्लरच्या मालकाकडून सांगण्यात आल्याचा आरोप निरंजन डावखरे यांनी केला. आजपासून अशा अवैध पार्लर, बारवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
हेही वाचा- भिवंडीत कोविडची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ?