ETV Bharat / city

Dilip Walse Patil on Raj Thackeray : पोलिसांचा अहवाल तपासून उद्या राज ठाकरेंबाबत मुंबईतील बैठकीत निर्णय घेणार - गृहमंत्री - राज ठाकरे सभा औरंगाबाद दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया

औरंगाबाद पोलीस आयुक्त हे अहवाल ( Dilip Walse Patil on Raj Thackeray news ) सादर करणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर उद्या मुंबईत बैठक घेऊन राज ठाकरेंवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil on Raj Thackeray rally Aurangabad ) यांनी सांगितले.

Dilip Walse Patil on Raj Thackeray rally Aurangabad
राज ठाकरे सभा दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया
author img

By

Published : May 2, 2022, 10:40 AM IST

मुंबई - औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. यावर बोलताना औरंगाबाद पोलीस आयुक्त हे अहवाल ( Dilip Walse Patil on Raj Thackeray news ) सादर करणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर उद्या मुंबईत बैठक घेऊन राज ठाकरेंवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil on Raj Thackeray rally Aurangabad ) यांनी सांगितले.

हेही वाचा - चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करा- आम आदमी पक्ष

पोलिसांच्या अहवालानुसार कारवाई - औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असा आरोप होत आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कालच्या सभेमध्ये फक्त पवार साहेब यांच्यावर टीका करणे आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा कसा, तेढ निर्माण कसा होईल याचाच प्रयत्न त्यांनी केला. कालच्या त्यांच्या भाषणाचे पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहे. त्याच्यातून आक्षेपार्ह विधान, अटी शर्तींचा भंग केला आहे की नाही ते सर्व बघून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त अहवाल राज्य सरकारला उद्या सादर करतील आणि उद्या मुंबईत बैठक घेतल्यानंतर या बैठकीमध्ये चर्चेअंती काय करावे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

पवार साहेबांवर राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे आरोप याअगोदर सुद्धा केले आहेत. याचे काय परिणाम होतील अशातला भाग नाही. पवार साहेबांचे राजकीय आणि सामाजिक जीवन महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचे, समाजाला उभे करण्याचे काम केले आहे. त्यांनी हजारो महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यांनी राज्याची समृद्धी झालेली आहे. ज्यांच्याकडे काहीच करायला नसते, काही सांगायला नसते, ते लोक अशा पद्धतीचे आरोप करत असतात, असे सांगत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

त्यांच्याकडे दुसरे काही सांगायला नसल्याने अशा पद्धतीचे मुद्दे काढले जातात. एखाद्याचे आस्तिक असणे आणि नास्तिक असणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपला धर्म मांडण्याचा, जोपासण्याचा अधिकार आहे. पवार नास्तिक आहेत का? हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. त्या बदल्यात राज ठाकरे यांनी बेरोजगारी वाढलेली आहे त्याबद्दल बोलायला पाहिजे. प्रचंड उन्हामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, याबद्दल बोलायला पाहिजे. केंद्र सरकारमुळे पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे. फक्त पवार साहेब आणि भोंगे हे दोन विषय त्यांच्याकडे उरलेले आहेत. त्यांच्याकडे कृती करण्यासारखे काही नाही. त्यांना फक्त आपल्या भाषणाद्वारे समाजात तेढ निर्माण करणे एवढेच काम उरलेले आहे, असा टोलाही दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.

माझे सर्व धर्मांतील लोकांना मग ते मुस्लीम असो, हिंदू असो, इतर धर्मांचे लोक असतील त्यांना आव्हान आहे की, अशा पद्धतीने समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न जे लोक करत आहेत, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. माथी भडकवण्याचे काम हे लोक करत आहेत. पण, त्याकडे लक्ष न देता समाजामध्ये एकोपा ठेवावा, शांतता ठेवावी, असे आव्हान त्यांनी सर्व धर्मियांना केले आहे.

हेही वाचा - SpiceJet Mumbai-Durgapur flight : मुंबई-दुर्गापूर विमानाला वातावरणाचा अडथळा;13 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.