मुंबई - शाहू नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या 32 वर्षाच्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत शाहू नगर पोलीस ठाण्याला भेट देऊन कर्मचाऱ्यांना धीर दिला. यासोबत अमोल कुलकर्णी यांच्या कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी, 50 लाख रुपये, पोलीस वेल्फेअर फंडातून 10 लाख तसेच बँक इन्शुरन्सच्या माध्यमातून 5 लाख अशी 65 लाखांची मदत जाहीर केली आहे.
16 मे रोजी अमोल कुलकर्णी घरातील बाथरूम मध्ये बेशुद्धावस्थेत सापडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 16 मे रोजी या अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आल्याचे स्पष्ट झाले.