मुंबई - मालवणी कसाईवाडा परिसरात घर कोसळले ( Home Collapsed in Mumbai ) आहे. ढिगाऱ्यात तीन जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी ( Fire brigade at Malavani Kasaiwada ) हजर होत्या. संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
लाड पश्चिम येथील मालवणी परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक घर कोसळले. अपघातात एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. मालवणी येथील प्लॉट क्रमांक 37 मध्ये घर कोसळल्याने महिला जखमी ( Woman injured in home collapsed incident ) झाली आहे. त्यांच्या पायाला 14 टाके पडले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच राज्याचे मंत्री तथा काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. मालाड पश्चिम मालवणी गेट क्रमांक 6 प्लॉट क्रमांक 37 मध्ये हे घर कोसळल्याची घटना घडली आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाची संपूर्ण टीम घटनास्थळी हजर झाले आहे. बचावकार्य सुरू आहे. चार वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा-Maharashtra Police Achievement : महाराष्ट्र पोलीस दलाला ५१ पदके; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक